Umared

माँ जिजाऊ जन्मोत्सवा निमित्य जिव्हाळा संस्थे च्या वतीने ‘‘स्वागत स्त्री जन्माचे’’…

माँ जिजाऊ जन्मोत्सवा निमित्य जिव्हाळा संस्थे च्या वतीने ‘‘स्वागत स्त्री जन्माचे’’…विशाल मासुरकर
उमरखेड – राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊसाहेब यांच्या जयंती चे तथा युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती चे व राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून उमरखेड- महागाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.नामदेवराव ससाणे यांच्या पत्नी प्रा.सौ. अनुजाताई नामदेव ससाणे व मा. स. सौ. सविता ताई चितांगराव कदम ( तालुका अध्यक्ष सरपंच संघटना ) हस्ते ‘‘स्वागत स्त्री जन्माचे’’ हा उपक्रम घेण्यात आला या वेळी रुग्णालयात मध्ये दोन मातांना कन्या रत्न झाल्याची वार्ता , एम.एस. जोरगेवार अधिपरीचारक यांनी दिली त्या वेळी रेश्मा भोजीराज चव्हाण, बोथा व उगमा परवीन याकुब खान, नांदेड या मातांच्या कन्यारत्नांना संस्थे च्या वतीने कन्या रत्नासाठी फ्रॉक , आईला पीस , वडिलाला दुपटा , पुष्प गुच्छ व पेडा देऊन सन्मान करण्यात आला.माँ जिजाऊ जन्मोत्सवा निमित्य जिव्हाळा संस्थे च्या वतीने ‘‘स्वागत स्त्री जन्माचे’’...या सर्व मातांनी संस्थेचा ‘‘स्वागत स्त्री जन्माचे’’ हा उपक्रम पाहून आनद व्यक्त केला. या वेळी जिव्हाळा संस्थे च्या सचिव रोहिणीताई अलमुलवार यांनी असे सांगितले कि जिव्हाळा संस्थे चा ‘‘स्वागत स्त्री जन्माचे’’ हा उपक्रम संस्था मुळावा येथे २०१५ पासून सातत्याने राबिवीत असून क्रांतीज्योती सावित्रीबाई बाई फुले यांच्या जयंती चे औचित्य साधून आज दि. ०३ जानेवारी बालिका दिना निमित्य उमरखेड येथे सुरु करण्यात आला आहे या मागील संस्थे चा मुख्य उदेश समाजामधील घसरत असलेला मुलींचा जन्म दर वाढविणे स्त्री भ्रूण हत्या थांबविणे स्त्री पुरुष समानता लेक वाचवा, लेक वाढवा लेक शिकवा हा संदेश समाजामध्ये देण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येतो असे ते म्हणाल्या. त्या नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.सौ. अनुजाताई नामदेव ससाणे यांनी आज राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊसाहेब यांच्या जन्महोत्स्वा निमित्य सर्व माँ जिजाऊ च्या लेकींच्या हस्ते कन्या रत्नांच्या जन्माचे स्वागत केले या बद्दल सर्व प्रथम संस्थे आभार आणले व जिव्हाळा संस्थे च्या ‘‘स्वागत स्त्री जन्माचे’’ या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व आज मुलींचा समाजामध्ये घसरत चालेलेला दर व स्त्री भ्रूण हत्या यावर खंत व्यक्त केली तसेच संस्थे च्या या उपक्रमा खूप खूप शुभेच्छा.. देऊन या उपक्रमास उमरखेड – महागाव विधानसभा क्षेत्रा मध्ये जास्तीत जास्त गावागावत पोहोचावी या करीता आम्ही संस्थेस सर्वतोपरी मदत करू असे सांगितले. या नंतर संस्थे च्या सलागार सौ. संगीता अतुल मादावार यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे संस्थे च्या वतीने आभार मानले. या कार्यक्रमा प्रसंगी प्रा.सौ. अनुजाताई नामदेव ससाणे , मा. स. सौ. सविता ताई चितांगराव कदम (तालुका अध्यक्ष सरपंच संघटना), कविताई मारोडकर , (नगरसेविका, उमरखेड ) शबाना खान (सत्य निर्मिती महिला मंडळ) ,सरोजना परसराम कर्नेवाड ( संचालिका शिक्षक पतसंस्था), जोरगेवार ताई , निलोफर पठान, रोहिणीताई अलमुलवार ( सचिव जिव्हाळा संस्था ) संगीताताई, राधाताई वासमवार, विजय भाऊ रेघाटे, परसराम कर्नेवाड, संगीता अतुल मादावार ( सलागार जिव्हाळा संस्था) संस्थे चे अध्यक्ष अतुल भाऊ मादावार संस्थे चे स्वयंसेवक संतोष जाधव, शुभम कळलावे बाबासाहेब गाडगे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button