Maharashtra

सह्याद्री आदिवासी ज्येष्ठ नागरिक संघ पुणे कडून मुख्यमंत्री सहायता निधी – कोविड १९” या नावाने रू. ५१,००० मदत

सह्याद्री आदिवासी ज्येष्ठ नागरिक संघ पुणे कडून मुख्यमंत्री सहायता निधी – कोविड १९” या नावाने रू. ५१,००० मदत

प्रतिनीधी – दिलीप आंबवणे

सह्याद्री आदिवासी ज्येष्ठ नागरिक संघ, महाराष्ट्र पुणे ही संस्था आदिवासी समाज विकासाचे हक्क अबाधित ठेवणे आणि शैक्षा सामाजिक प्रबोधन कार्य संस्थेच्या स्थापनेपासून करीत आहे.
संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री डी. बी. घोडे यांनी तत्काळ कार्यवाही करून ” मुख्यमंत्री सहायता निधी – कोविड १९” या नावाने रू. ५१,०००/- ( रुपये एकावन्न हजार फक्त ) एवढी मदत सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पिंपळे गुरव, पुणे या शाखेतून NEFT, UTR No. 20191205087 द्वारे पाठविली.
कोरोना covid १९ या महामारी संसर्ग रोगाच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी आदिवासी समाजाची सुद्धा तितकीच महत्वाची जबाबदारी आहे हा महत्त्वाचं विचार गेल्या ४० वर्षांपासून महाराष्टातील विविध आदिवासी समाज विकास संघटनांमध्ये सतत आर्थिक आणि बौद्धिक योगदान देणारे , केंद्र व राज्य शासनाच्या सुपर्कलास वर्ग १ या सनदी पदावरून निवृत्त झालेले सह्याद्री आदिवासी ज्येष्ठ नागरिक संघाचे विद्यमान उपाध्यक्ष प्रकाश केंगले, सल्लागार संचालक मोतीराम भालचिम, श्री मुरलीधर जोशी, श्री सोमनाथ गवारी आदी मान्यवरांनी हा विचार संस्थेकडे मांडला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button