Amalner

Amalner: विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ..

Amalner: विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ..

विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था दिल्लीची संलग्नित विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने अंगणवाडी (शिशु वर्ग ) , पूर्व प्राथमिक , प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक व पालकांसाठी पायाभूत स्तर एन.ई.पी. ( N..E.P. ) प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ‌३ मे ते १३ मे २०२३ या कालावधीत अमळनेर जि. जळगाव येथे करण्यात आले आहे.

आपल्यावर आलेली पालकत्वाची जबाबदारी हे निश्चितच कस लावणारी असते. प्रत्येक पालक आपल्या पाल्याला उत्तम दर्जेदार व संस्कारित शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी विद्याभारती शिक्षक पालक हितचिंतक यासाठी दरवर्षी एका प्रशिक्षण व प्रबोधन वर्गाचे आयोजन करत असते नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे एन. इ. पी. २०२० सर्वत्र लागू करण्यात आले आहे या धोरणात शालेय शिक्षणाचे टप्पे ५+३+३+ ४ असे आहेत. या प्रशिक्षणात एन. ई. पी. ची ही माहिती देण्यात येणार आहे. याच वर्गात सोबत एन.ई. पी. वर्ग , बालिका शिक्षण , संस्कृति ज्ञान परीक्षा , वैदिक गणित , योग व संगित यांचेही प्रशिक्षण वर्ग वेगळे असणार आहे.

तरी या प्रशिक्षण वर्गात शिक्षक पालक व त्यांच्या हितचिंतक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विद्याभारती देवगिरी प्रांत यांच्यावतीने वर्ग व्यवस्था प्रमुख तथा विद्या भारती देवगिरी प्रांताचे प्रचार व प्रसार प्रमुख श्री. राजेंद्र निकुंभ , ८६२५९३००२२ , ९४२३९०३२४५ , जिल्हा अध्यक्ष श्री. दिलीप भावसार ९५२७७१८३५५ , वर्ग व्यवस्था सहप्रमुख श्री. दिनेश नाईक ९२२६७८५७९५ , प्रांताध्यक्ष श्री विवेक काटदरे , प्रांत मंत्री श्री प्रकाश पोद्दार , प्रांत सहमंत्री श्री. दिनेश देशपांडे , प्रांत शिशु वाटिका संयोजिका सौ. वनमाला कुलकर्णी , प्रांत शिशु वाटिका सह सं

योजिका सौ.सुरेखा सोनार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
हा प्रशिक्षण वर्ग खांदेश शिक्षण मंडळ अमळनेर संचलित प्रताप महाविद्यालय , अमळनेर जिल्हा जळगाव येथे होणार आहे. हा प्रशिक्षण वर्ग निवासी असून त्यामध्ये निवास व्यवस्था, भोजन , न्याहरी , प्रशिक्षण साहित्य व प्रशिक्षणाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. या वर्गासाठी शुल्क रुपये दोन हजार ( २००० ) इतके ठेवण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button