World

Amazing: बापरे इथे केली जाते सापांची शेती… पहा व्हिडिओ…

Amazing: बापरे इथे केली जाते सापांची शेती… पहा व्हिडिओ…

साप हा भयानक आणि धोकादायक प्राणी आहे. त्याच्या नावानेही अनेकांना घाम फुटायला होतं. जवळपास सर्वच लोक सापाला घाबरत असतील. सापांविषयी आत्तापर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या असतील. मात्र कधी सापांची शेती किंवा सापांची बाग याविषयी ऐकलंय का?. नसेल तर ही बातमी वाचा. असंही एक ठिकाण आहे जिथे लोक सापांची शेती करतात. सापांची चक्क एक बाग आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे याविषयी जाणून घेऊया.

आंब्याच्या, चिकूच्या, पेरूच्या, जशा बागा असतात अशीच सापाची बाग आहे. या बागेत झाडाला फळं फुले नाहीत तर साप लटकलेले दिसतात. ही बाग व्हिएतनीममध्ये आहे. 12 हेक्टरमध्ये पसरलेल्या या फार्ममध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतील. दरवर्षी सुमारे 1500 लोक सर्पदंशानंतर उपचारासाठी या फार्ममध्ये येतात.

व्हिएतनामच्या त्राय रन डोंग टॅममध्ये सापांची लागवड केली जाते. इतर शेतात ज्या पद्धतीने फळे आणि भाजीपाला पिकवला जातो, त्याचप्रमाणे येथे साप पाळले जातात. या शेतीमध्ये औषधी साहित्याचे उत्पादनही घेतले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, येथे चारशेहून अधिक प्रकारचे विषारी साप आहेत. त्यांच्या विषापासून औषधे बनवली जातात. यासोबतच त्यांचे विष कापण्यासाठी अँटीडोसही बनवले जातात. लाखो पर्यटक दरवर्षी डोंग टॅम स्नेक फार्मला भेट देतात. त्यांच्यासाठी सापांची बाग ही आश्चर्याची बाब आहे.दरम्यान, @kohtshoww या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या बागेतील झलक दाखवण्यात आली आहे. व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला झाडावर साप लटकलेले दिसतील. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button