Bid

मांग वडगावचे पारधी हत्याकांड पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा – उत्तरेश्वर कांबळे

मांग वडगावचे पारधी हत्याकांड पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा
– उत्तरेश्वर कांबळे

केज तालुक्यातील मांगवडगांव येथे जमिनीच्या वादातून जातीयवादी गावगुंडानी पारधी समाजातील बाबू शंकर पवार वय- (70) प्रकाश बाबू पवार वय -(50) संजय बाबू पवार वय -(45)या तिघांची अंत्यत अमानुषपणे हत्या केली आहे. या हत्याकांडाचा कट पुर्व नियोजित होता या हत्याकांड पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. असे भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.

जातीयवादी गावगुंडानी पारधी कुटूंबावर अनेकदा प्राणघातक हल्ले केले होते म्हणून त्यांच्या दहशतीला कंटाळून हे पारधी कुटूंब अंबाजोगाईला राहत होते. न्यायालयीन लढाई जिंकून पारधी कुटूंबाने ही जमिन पुन्हा मिळवली होती म्हणून जातीयवाद्यांच्या मनात अनेक वर्षेपासुन त्याचे शल्य होते.

या हत्याकांड प्रकरणी पोलीसांनी सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत मोहन निंबाळकर, राजेभाऊ काशिनाथ निंबाळकर,बाळासाहेब बाबू निंबाळकर, राजाभाऊ हरिचंद्र निंबाळकर, अशोक अरूण शेंडगे, कुणाल राजाभाऊ निंबाळकर, शिवाजी बबन निंबाळकर, बबन दगडू निंबाळकर, जयराम तुकाराम निंबाळकर आणी संतोष सुधाकर गव्हाणे अशा 12 जातीयवादी गावगुंडांना संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही उत्तरेश्वर कांबळे यांनी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button