Chalisgaon

जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य धोक्यात – पोलीस वसाहतीच्या मागील गटारी तुंबल्या तर फवारणी देखील नाही 

जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य धोक्यात – पोलीस वसाहतीच्या मागील गटारी तुंबल्या तर फवारणी देखील नाही मनोज भोसलेचाळीसगाव – कोरोना आजाराने जगभरात थैमान घातल्याने सर्वच जण भयभीत झाले आहे शिवाय न भूतो न भविष्यती असा तब्बल 21 दिवसाचा लॉक डाऊन आहे यावेळी फक्त आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा यांच्या सह पोलीस बांधव जीव धोक्यात घालून रात्रंदिवस रस्त्यावर थांबून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत आहे असे असले तरी शहरातील बस स्टँड मागील पोलीस वसाहतीत स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने त्यांचे व परिवाराचे आरोग्य धोक्यात आले आहे या वसाहती मागच्या गटारी तुंबल्या असून तेथे औषध फवारणी देखील झाली नाही नगरपालिका प्रशासनाने येथे गटारी स्वछ करून औषध फवारणी करावी अशी मागणी होत आहे.जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य धोक्यात - पोलीस वसाहतीच्या मागील गटारी तुंबल्या तर फवारणी देखील नाही शहरातील बस स्टँड मागील पोलीस वसाहतीच्या मागील बाजूस म्हणजेच न्यायालयाच्या मागील भिंतीलगत मोठी गटार आहे ही गटारे अनेक दिवसांपासून स्वछ झाली नाही शिवाय पंचायत समितीच्या क्वाटर मागील अर्थात पोलिस वसाहती मागील परिसरात घाणीचे साम्राज्य आहे त्याठिकाणी पोलीस बांधव व त्यांचा परिवार वास्तव्यास आहेत त्याठिकाणी दुर्गंधी तर आहेच शिवाय कोरोना आजाराचे सावट गडद असताना पोलिस वसाहतीत साधी औषध फवारणी देखील करण्यात आलेली नाही, दिवसभर जीवाची पर्वा न करता रस्त्यावर थांबून कर्तव्य बजवा व घरी आल्यावर दुर्गंधी अशी परिस्थिती झाली आहे म्हणून नगरपालिका प्रशासनाने तेथील गटारी साफ करून औषध फवारणी करावी अशी मागणी होत आहे.जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य धोक्यात - पोलीस वसाहतीच्या मागील गटारी तुंबल्या तर फवारणी देखील नाही 

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button