Kalwan

कळवण ता.भाजपा चे श्रीक्षेत्र सप्तशृंगी देवी निवासीनी येथे घंटानाद आंदोलन…!

कळवण ता.भाजपा चे श्रीक्षेत्र सप्तशृंगी देवी निवासीनी येथे घंटानाद आंदोलन…!

विजय कानडे

भारतीय जनता पक्ष कळवण तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र आघाडी सरकारला जागे करून भाविकांसाठी श्री क्षेत्र सप्तशृंगी निवासीनी देवस्थान खुले करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

देशभरातील प्रमुख धार्मिक स्थळे,देवालये सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने पत्रक केलेले असताना देखील ,सरकारच्या अजब निर्णयाने राज्यातील देवालये सर्वांसाठी खुले झाले मात्र मंदिरे बंद ठेवून भाविकांची कुचंबणा केली. तसेच तिर्थक्षेत्र परिसरातील बहुसंख्य लोकांची उपजीविका देवस्थानावर अवलंबून आहे. त्या अनुषंगाने सर्व नियम,मान्य करून देवस्थाने,भजन,किर्तन सुरू करावे हि सर्वांची एकमुखाने मागणी होती. म्हणून प्रदेश भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले..

श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डाॅ. सौ.भारतीताई पवार,जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार,मा.जिल्हाध्यक्ष विकास देशमुख,तालुकाध्यक्ष दिपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाली गडावर पहिल्या पायरीवर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला प्रसंगी सप्तशृंगी गड व परिसरातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.. या आंदोलनाप्रसगी जेष्ठ नेते गोविंद कोठावदे, सरचिटणीस विश्वास पाटील, जि.का.सदस्य सचिन सोनवणे, महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली जाधव, सरचिटणीस कृष्ण कुमार कामळस्कर, किसान आघाडी अध्यक्ष काशिनाथ गुंजाळ, उपाध्यक्ष मोती.वाघ, हेमंत रावले गोरख पवार वाघ सर,यतिन पवार, युवा मोर्चा अध्यक्ष हितेंद्र पगार ,प्रविण रौंदळ, दिनेश आहेर, चिटणीस रामकृष्ण पगार, ऊमेश पगार,रुपेश शिरोडे,अमित देवरे,चंद्रकांत पवार,संतोष आहेर पंकज पवार,सुनिल पवार,रविंद्र पवार,पंकज पवार, शहराध्यक्ष प्रकाश कडवे,विनायक दुबे, पुरोहित संघ,समाज बांधव ,गोरख पवार,समाधान वाघ , संतोष आहेर, मिलिंद दिक्षीत,प्रकाश जोशी…इ.बहुसंख्य कार्यकर्ते आंदोलनास उपस्थित होते…….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button