नदी हमारी माता है,जनम जनम का नाता है,
साहेबरावदादा हर दिल को भाता है, क्योंकी वही सच्चे दिलसे नदीसें जनम देनेवाली माँ समान नाता निभाता है
रजनीकांत पाटील
अमळनेर शहरातून बोरी नदी वाहते.महाराष्ट्रातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणा-या अमळनेर नगरीत बोरी नदीपात्रात सदगुरु श्रीसंत सखाराम महाराज यांचे समाधीस्थळ आहे.सदर बोरी नदीपात्रात संपुर्ण शहराचे दुर्घंधीयुक्त सांडपाणी सोडले जात होते. साहेबरावदादा २००९ साली विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदारपदी निवडून आलेत व त्यानंतर अमळनेर नगरीच्या सौंदर्यात विविध विकासकामांनी भर पडायला जणुकाही सुरुवातच केली. बोरीनदीवर एक नव्हे तर तब्बल सात पुलांना मंजुरी मिळवत पुर्ण करुन बोरीनदीच्या सौंदर्यात भर घालत आपल्या कार्यकुशलतेची व दुरदृष्टीपणाची जणुकाही जनतेला साक्षच दिली. बोरी नदी पात्रात येणारे शहराचे दुर्घंधीयुक्त सांडपाणी रोखण्यासाठी सखाराम महाराज समाधीस्थळापासून ते गांधलीपुराकडील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत गटारीचे बांधकाम केले.तसेच सन २००९ सालापासून तर आजपावेतो दरवर्षी साहेबरावदादा जन्मदात्या आईप्रमाणे बोरीनदीला आई मानत तिला स्वच्छ करण्याचे काम ईमान-इतबारीने करत आलेले आहेत व नदीपात्रात यंदा जुलै महीन्यापासून स्वच्छ पाणी खळखळ वाहत आहे. साहेबरावदादांच्या मार्गदर्शनाने अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या सहकार्याने यावर्षीसुध्दा बोरी नदीच्या स्वच्छतेचे काम जोरात सुरु असल्याचे पाहून अमळनेरकर नागरीक धन्यता मानत आहेत.






