‘संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता ’ अभियानांतर्गत प्लास्टिक निर्मूलनासाठी चांपा येथे जनजागृती रॅली.
चांपा येथे श्रमदानातुन प्लास्टिक निर्मूलनासाठी ३१५किलो प्लास्टिक गोळा .
चांपा अनिल पवार
‘संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता ’ अभियानांतर्गत चांपा येथे प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. २ आॅक्टोबर ते ३१डिसेंबर या कालावधीत संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता या अभियानांतर्गत चांपा गावात विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली.प्लास्टिक निर्मूलनासाठी सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ३१५किलो प्लास्टिक गोळा करण्यात आला असून संपूर्ण कालावधीत प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन या विषयावर जनजागृती करण्यात आली. गाव व परिसर स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येत आहे.चांपा गावात रस्त्यालगत व परिसरात आढळणारा प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात संकलित करून त्याची योग्य प्रमाणात विल्हेवाट लावणे तसेच ग्रामपंचायत हद्दीतील दुकाने हातगाडीवरील छोटे विक्रेते यांना नवीन प्लॅस्टिक पिशवी वापरण्यावर प्रतिबंध करणे तसेच गावातील सर्व शाळा अंगणवाडी व इतर परिसर स्वच्छ ठेवणे, जैविक कचऱ्याचे कंपोस्टिंग करणे यावर रॅलीत जनजागृती करण्यात आली.
गटविकास अधिकारी सुरेश कोल्हे , सरपंच अतिश पवार ,यांच्या मार्गदर्शनाखाली विजय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तर्फे प्लास्टिक निर्मूलनासाठी ग्रामपंचायत कार्यालय ते आठवडी बाजार , जिल्हापरिषद शाळा , व इतर संपूर्ण गावात बीमारियों का भुत भगाओ , स्वच्छता का मूलमंत्र आपनाओ , स्वच्छ गाव , प्लास्टिक मुक्त चांपा , आदी घोषणांनी जनजागृती रॅली काढण्यात आली . यावेळी उपसरपंच अर्चना सिरसाम ग्रा.पं सदस्य, अस्मिता अरतपायरे , मिराबाई मसराम , विजय विद्यालयचे प्राचार्य नागदेवें विजय विद्यालयातील एन सि सि पथकचे तलवारे सर व विद्यार्थीगण , अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र नेहारे , यांनी प्लॅस्टिक बंदी मोहीम राबविणे, गावातील सर्व व्यावसायिकांना तसेच ग्रामस्थांना जनजागृती रॅलीद्वारे आवाहन करण्यात आले.






