Nandurbar

नंदुरबार शहरात अत्यावश्यक सेवा पुरवण्यसाठी वेळा पत्रक जारी…

नंदुरबार शहरात अत्यावश्यक सेवा पुरवण्यसाठी वेळा पत्रक जारी…

नंदुरबार :- दिनांक 25/03/2020.
कॉरोना वायरसच्या धुमाकूळ रोखण्यासाठी प्रशासन फार दक्षता घेत असून वेळोवेळी नियम व अटी, लोकांसाठी प्रस्तुत करण्यात येत आहे. दोन दिवसा पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री 8 वाजता 21 दिवसासाठी भारत बंदची घोषणा केली. घोषणा झाल्याने लोकांमध्ये अफरातफर झाली व लोक जीवन आवश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी बाजारात आले.

खूप गर्दी झाली थोड्या वेळात महाराष्ट्राचे मूख्यमंत्री उद्धव ठाकरेनी पत्रकार परिषद घेऊन लोकांना शांत केल व त्यांना आश्वासन दिल की जीवन आवश्यक वस्तूचा साठा भरपूर असून कोणालाही चिंता करण्याची गरज नसून बाजारात गर्दी करण्यास टाळावे व घरी बसून कॉरोना वाइरसच्या संक्रमणातून आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.

या पार्श्वभूमीवर आज दिनांक 25/03 रोजी नंदुरबार तहसीलदार, शहर पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस निरीक्षक, मुख्याधिकारी नगर पालिका तर्फे नंदुरबार वासियांसाठी जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी वेळापत्रक काढण्यात आले व लोकांना निर्देश देण्यात आले की फारच गरज असल्या शिवाय घरातून बाहेर येणे टाळावे. संचारबंदी लागू असून विना कामी कोणी रोडवर दिसला तर त्यांचा विरुध्द कारवाई करण्यात येईल व वेळापत्रकवर दिलेले दुकान व्यतिरिक्त कोणतीही दुसरी दुकाने उघडण्यास मान्यता नसुन तसे केल्यास कडक कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागणार आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button