Chalisgaon

मालेगाव कडे जाणारी नाशिक जिल्हा हद्दीची आमदार मंगेश चव्हाण यांनी केली पाहणी

मालेगाव कडे जाणारी नाशिक जिल्हा हद्दीची आमदार मंगेश चव्हाण यांनी केली पाहणी

पोलीस व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांसह घेतला आढावा

नितीन माळे

नाशिक जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यालागत असलेल्या मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने चाळीसगाव येथून मालेगाव कडे जाणारे सर्व रस्ते सील करण्यात यावेत अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातून होत होती, या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, तहसीलदार अमोल मोरे, चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक शिकारे, मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांच्यासह साकुर फाटा येथील नाशिक जिल्हा हद्द सील करून उपाययोजनांचा आढावा घेतला.

तसेच सायगाव मार्गे नांदगाव – मनमाड मार्गे नाशिक जिल्ह्यात जाता येत असल्याने तिथे एक चेकपोस्ट नेमण्यात आले आहे तसेच लोंढे – रामनगर – हिसवाळ मार्गे मालेगाव जाण्यासाठी रस्ता मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत असून त्यामार्गे देखील चोरटी वाहतूक होण्याची शक्यता लक्षात घेता ती जिल्हा हद्द देखील तात्काळ सील करण्याच्या सूचना आमदार चव्हाण यांनी दिल्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही परिस्थिती नाशिक – धुळे – औरंगाबाद जिल्ह्यातून अवैध वाहतूक होता कामा नये याबाबत जागरूक राहण्याच्या व कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
#IndiaFightsCorona
#SafeChalisgaonSaveChalisgaon

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button