Maharashtra

ग्रामीण भागात किरनादुकानाच्या नावाखाली गुटखा विक्री किरनादुकानदार लूट करत भरतोय खिसा

ग्रामीण भागात किरनादुकानाच्या नावाखाली गुटखा विक्री
किरनादुकानदार लूट करत भरतोय खिसा

रजनीकांत पाटील

अमळनेर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर शासन कुठल्यान कुठल्या उपाययोजना करत सामन्य नागरिकांसाठी धावपळ करत जीवन आवश्यक वस्तू पूर्वत आहे. तसेच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते गरीब जनता उपाशी राहू नये म्हणून घरपोच शक्य होईल तेवढे अन्नदान करत आहे. तसेच पोलीस प्रशासन,डॉक्टर, पत्रकार जीवाची पर्वा न करता आपली सेवा बाजावत आहे. अश्या ह्या बिकट परिस्थितीत देखील तालुक्यातील काहीनी कोणत्या न कोणत्या प्रकारे आपल्या खिसा भरत आहे.यात जास्त किराणा दुकानदारांचा समावेश आहे. कुठल्याही नियम न पाळता सर्वच नियमांना धाब्यावर बसवून वरती किराणा दुकान अशा नावाचा बोर्ड/तर खालून गुटखा विक्री किराणा पेक्षा जास्त गुटखा विक्री करत आहे. ग्रामीण भागात गुटखा सर्रास विक्री होत आहे या बाबत देशभरात लॉक डाउन असतांना हा गुटखा कसा काय येतोय व तो दुकानदार पर्यंत कसकाय पोहचतो ही मात्र आश्चर्याची बाब आहे.
सध्याच्या अश्या या बिकट परिस्थितीत शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकान उघडे ठेवण्यास परवानगी दिली आहे मात्र ग्रामीण भागतील काही किरणा दुकानदार चोरी छुपे जादा दराने 10 रुपयांना मिळणारी विमल आज 25 रुपये विकत व 20 रुपये किमतीची विमल 50 रुपये दराने विकत नागरिकांना व्यसनाधीन करत स्वतःचा खिसा भरत आहे. नावालाच किरणां दुकान म्हणणारे आज गुटका विक्री करतांना दिसत आहे अश्या या किराणा दुकानाच्या नावाखाली गुटखा विक्री करणाऱ्या बोगस दुकानदारांनवर कार्यवाही करावी अशी मागणी वरिष्ठांकडून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button