Amalner

?️ Big Breaking….अमळनेर येथे सहा अधीक्षक सचिन गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली गणेशोत्सव बैठक

अमळनेर येथे सहा अधीक्षक सचिन गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली गणेशोत्सव बैठक

नूरखान

अमळनेर फौजदारी दंड प्रक्रिया सहीता कलम १४९ आगामी श्रीगणेशोत्सव सण २०२० दि. २२-०८-२०२० ते दि. ०१-०९-२०२० दरम्यान तसेच दि.२२-०८-२०२० ते दि.३१-०८-२०२० या दरम्यान गणपती उत्सव सण साजरा होणार आहे. सध्या कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता सर्व सण उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्ण बाबत शासनाकडुन वेळोवेळी निर्णय घेण्यात आलेले आहेत.128 वर्षांच्या परंपरेला दुसऱ्यांदा खंड पडत आहे.

  • आपण मुर्तीकारांगणपती मंडळ स्थापक डडि.जे. ढोल ताशा पथकाचे मालक आहात. शासनाने श्रीगणेशोत्सव सण २०२० करिता दिलेल्या मार्गदर्शक सुचना प्रमाणे श्रीगणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुक काढता येणार नाहीत. तसेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक चा वापर केवळ आरतीसाठीच करावा बाबत सुचित केलेले आहे. सध्या कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता श्रीगणेशोत्सव व मोहरम सणानिमीत्त मिरवणुका काढता येणार नसल्यामुळे आपणास आपले वाद्य बैंड,डि.जे.,ढोल ताशा वाजविण्यास मनाई करण्यात येत आहे.
  • आरती झाल्या नंतर प्रसाद वाटण्यास मनाई आहे तसेच आरती ही 4 ते 5 लोकांमध्ये च करण्यात यावी.आरती ही ऑनलाइन किंवा फेसबुक लाईव्ह पध्दतीने लोकां पर्यंत पोहचवावी.गणेश विसर्जन झाल्या नंतर भंडारा ठेवता येणार नाही.
  • मुर्तीकार व गणेश मंडळ स्थापकातील पदाधिकारी यांनी श्री गणेशाची मुर्ती ही शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे मुर्तीची उंची ही ४ फुटाच्यावर राहणार नाही. याची दक्षता घेणे बंधनकारक आहे. मा. जिल्हाधिकारी साो, जळगांव यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजणा म्हणुन संपुर्ण जळगांव जिल्ह्यात मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये खबरदारीचे उपाय म्हणुन नागरीकांना एकत्र येण्यास मनाई केलेली आहे. आपण वरील सुचनांचे, अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास तसेच आपले वाद्य बँड,डि.जे./ढोल ताशा वाजवितांना मिळुन आल्यास आपले विरुध्द प्रचलित कायद्यान्वये कायदेशिर कारवाई करण्यात येईल व सदरची नोटीस आपले विरुध्द पुरावा म्हणुन मा. न्यायालयात सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  • घरगुती मूर्ती 2 फुटा पेक्षा मोठी नसावी
  • सर्व नियम आणि कायदा सुव्यवस्था पाळत जिल्हा स्तरावर पारितोषिक देण्यात येईल.
  • कोंटेन्मेंट झोन मधील गणेश मंडळांनी गणेश प्रतिष्ठापना करू नये. मंडळाचा अध्यक्ष घरी मूर्ती बसवू शकतात.
  • सॅनिटायझरचा उपयोग करणे,मास्क वाटप करणे,सोशल डिस्टनगसिंग ठेवणे,समाज उपयोगी कामे करणे,गणेशोत्सव साठी लागणारा खर्च सत्कारणी लावावा.
  • विसर्जनाच्या दिवशी गणेश मुर्त्या नगरपरिषद संकलित करून प्रशासन मुर्ती विसर्जित करेल.
  • बैठकीसाठी सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष,DJ साउंड चे अध्यक्ष, पो निरीक्षण अंबादास मोरे,पो कॉ हितेश चिंचोरे,दिपक माळी, रवी पाटील,चाळीसगाव पो कॉ प्रताप पाटील,नितीन वाल्हे, पो कॉ चाळीसगाव तसेच पत्रकार बंधू भगिनी इ उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गोपनीय अंमलदार शरद पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button