Sangali

बिकेडी च्या पलूस तालुका अध्यक्ष पदी पुनाजी साबळे यांची नियुक्ती

बिकेडी च्या पलूस तालुका अध्यक्ष पदी पुनाजी साबळे यांची नियुक्ती

सांगली / प्रतिनिधी दिलीप आंबवणे

बिरसा क्रांती दल सांगली व सह्यादी आदिवासी कर्मचारी असो. सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक उत्साहात पार पडली.
बिरसा क्रांती दल पलूस तालुका अध्यक्ष पदी पुनाजी साबळे यांची निवड करण्यात आली नियुक्ती पत्र पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी दिले.

त्यावेळी बिरसा क्रांती दल पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, सह्यादी आदिवासी कर्मचारी असो सांगली जिल्हा अध्यक्ष सिताराम भौरले, विद्यमान कार्याध्यक्ष तथा माजी अध्यक्ष एस. पी. जोशी बिरसा क्रांती दल पलूस तालुका अध्यक्ष पुनाजी साबळे, तालुका सचिव कैलास मडके, संचालक गुलाब भोईर, नारायण आढारी, शरद भौरले, आदी नागरिक उपस्थित होते.
साबळे म्हणाले, तालुक्यातील आदिवासी नागरिकांनी आपल्या समस्या सांगण्यासाठी उपस्थित राहावे,
भोईर म्हणाले, तालुका स्थरावर तक्रारी सुटत नसेल तर जिल्हास्थरावर सांगावे, नागरिकांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत.
भौरले म्हणाले, समन्वय साधून काम केले पाहिजे. कराड येथील आदिवासी मुलींचे वस्तीगृहाचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही संघटनेनी सोबत जाऊन भेट देऊ.
आढारी म्हणाले, अनुसूचित जमाती मधील घुसखोरी थांबवण्यासाठी काम केले पाहिजे. संघटनेनी काय काम केले आहे हे बाकी सभासद यांना माहिती साठी पुढील मिटींग मध्ये काय काम केले सांगितले पाहिजे.
मडके म्हणाले, प्रत्येक तालुका प्रतिनिधींनी मिटींग ला येणे गरजेचे आहे.
जोशी म्हणाले, आपण सर्वांनी आंबवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे खुप काम करत आहेत पण त्यांना हे काम करताना एकटे करून चालणार नाही त्यासाठी आपण सर्वांनी सोबत असले पाहिजे आता पर्यंत सातारा, रत्नागिरी या जिल्हातील कार्यकर्त्यांचा अभ्यास केला आहे आदिवासी बांधवांनी एकजूट झाले पाहिजे. नाहीतर अन्याय होत राहिल.
आंबवणे म्हणाले, आदिवासी बांधवांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात संघटनेकडे देत चला म्हणजे समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करता येतो. अनेक लोक अडचणी निर्माण झाल्या की मग आपला आदिवासी संघटना कडे धाव घेत आहेत. पण अन्याय होऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवावी लागते,काही लोक समाजामध्ये सहभागी होत नाही कदाचित ते आपल्या वरिष्ठ अधिकारी किंवा आजूबाजूला नागरिकांशी चांगले संबंध ठेवत असतील पण कधी कोणती अडचण येईल सांगता येत नाही. त्यामुळे संघटनेत सहभागी झाले पाहिजे. बिरसा क्रांती दल संघटनेचा कामाचा आढावा दिला. अनुसूचित जमाती असा उल्लेख आपल्या जातीच्या दाखल्यावर आहे त्यामुळे आपल्या आदिवासी दाखल्यावर धर्मांचा उल्लेख कुठेच नाही याची नोंद घ्यावी.
पुढील मिटींगला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button