Chalisgaon

वाघळी येथे नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद सव्वा दोनशे रुग्णांची नेत्र तपासणी : रोटरी ट्रस्ट च्या वतीने चष्मे वाटप : गरजूंना शस्त्रक्रिया साठी मदत

वाघळी येथे नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद

सव्वा दोनशे रुग्णांची नेत्र तपासणी :   रोटरी ट्रस्ट च्या वतीने चष्मे वाटप : गरजूंना शस्त्रक्रिया साठी मदत

वाघळी येथे नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद सव्वा दोनशे रुग्णांची नेत्र तपासणी : रोटरी ट्रस्ट च्या वतीने चष्मे वाटप : गरजूंना शस्त्रक्रिया साठी मदत

चाळीसगाव — प्रतिनिधी मनोज भोसले
येथील वि.का.सोसायटी गोडावून मध्ये मालेगाव रोटरी क्लब संलग्न रोटरी चरिटी ट्रस्ट संचलीत बी एस भंडारी रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव कॅम्प तसेच मारवाडी युवा मंच शाखा चाळीसगाव उमंग समाजशिल्पी  महिला परिवाराच्या सहकार्याने येथे नेत्र तपासणी संपन्न झाले. शिबिराच्या प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्त्या तथा उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

वाघळी येथे नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद सव्वा दोनशे रुग्णांची नेत्र तपासणी : रोटरी ट्रस्ट च्या वतीने चष्मे वाटप : गरजूंना शस्त्रक्रिया साठी मदत

यावेळी दत्तात्रय सूर्यवंशी, सुरेंद्र चौधरी, सचिन महाजन, अनिस मणियार, बारकु महाजन, नाना पाटील, सुभाष सूर्यवंशी, युनूस पठाण, गिरीश ब-हाटे, अनिल चव्हाण, वी का सोसायटीचे संचालक , ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सुमारे सव्वा दोनशे  रुग्णांची नेत्र तपासणी करून गरजूंना चष्म्याचे वाटप करण्यात आले. डॉ. अजय साळुंखे, डॉ.पांडुरंग पाटील, डॉ.योगेश साळुंखे, डॉ.सुधीर दंडगव्हाण, डॉ.सुरेश पवार या डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी करून ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया आवश्यक आहे. अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी बी एस भंडारी रोटरी आय हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले. तसेच गेल्या मंगळवारी पिंपळगाव येथे देखील दोनशे रुग्णांची नेत्र तपासणी करून गरजूंना शस्त्रक्रिया साठी  मालेगाव येथे पाठविण्यात आले. उद्या गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता तरवाडे येथील साई बाबा मंदिर परिसरात नेत्र  तपासणी चे  भव्य  शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती रवींद्र चौधरी व कार्यकर्त्यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button