फलटण

फलटण कॅनॉलमध्ये आंध्रचा ट्रक पडला; दोघे अडकल्याची भीती

फलटण कॅनॉलमध्ये आंध्रचा ट्रक पडला; दोघे अडकल्याची भीती

फलटण वार्ताहर हेमंत बागाव

महाड-पंढरपूर रस्त्यावरील विडणी (ता. फलटण) येथील कॅनॉलच्या पुलावरून बुधवारी मध्यरात्री ट्रक पडला. कॅनॉलमध्ये पाण्याचा प्रवाह असून त्यामध्ये दोघेजण अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान ट्रकची चारही चाके वर आली असून क्रेन आणून तो ट्रक बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

विडणी नजिक निरा उजवा कालवा जात आहे. कॅनॉल अरुंद असून त्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे. बुधवारी मध्यरात्री हा अपघात झाल्यानंतर त्याची माहिती उशिरा समोर आली. गुरुवारी सकाळी क्रेन आणुन त्यातील दोघेही बाहेर काढली.ही दोघेही मृत झाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार ट्रक आंध्र प्रदेश राज्यातील असून त्यामध्ये साहित्य असल्याचे समोर येत आहे. चालकाला वळणाचा अंदाज आला नसावा व त्यामुळे पुलाचे लोखंडी बार तोडून ट्रक पाण्यात पडला.

Leave a Reply

Back to top button