महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लुट थांबवा
चाळीसगाव भाजपाचे तहसीलदार यांना निवेदन
मनोज भोसले
महाविकास आघाडी शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत ची महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून त्याच्या गावनिहाय लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला महाविकास आघाडी शासनाच्या वतीने सांगण्यात आले की, सदर कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांना कुठेही हेलपाटे मारावे लागणार नाहीत तसेच कुठल्याही अट व शर्ती यासाठी राहणार नाहीत. मात्र प्रत्यक्षात अमलबजावणी करताना शेतकऱ्यांना आधार सीडिंग साठी CSC सेंटरवर जाऊन अंगठा द्यावा लागत आहे. सदर CSC सेंटर धारकांना प्रति शेतकरी शासनाकडून १२ रुपये मिळत असून शेतकऱ्यांकडून एक रुपयाही न घेण्याच्या सूचना असताना चाळीसगाव तालुक्यात CSC सेंटर धारकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट शेतकऱ्यांची केली जात आहे.

ती त्वरित थांबवावी या मागणीसह शेतकरी कर्जमाफी यादीत असलेल्या प्रचंड चूकांची दूरूस्ती करणेबाबत व सी.एस.सी.सेंटर धारकांना प्रत्येकी 12 रूपये मोबदला त्वरित देणेबाबतचे निवेदन चाळीसगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
याप्रसंगी तालूकाध्यक्ष प्रा.सूनील निकम, शहराध्यक्ष श्री .घृष्णेश्वर पाटील, उपाध्यक्ष श्री. महेश शिंदे,सरचिटणीस श्री. गिरीश बऱ्हाटे,श्री. अमोल चव्हाण ,चीटणीस श्री. कारभारी पवार, श्री. दिपकसींग राजपूत, यूवामोर्चा तालूकाध्यक्ष श्री. सूनील पवार, पंचायत समिती गटनेते श्री. संजूतात्या पाटील, जेष्ठ नेते श्री. नानाभाऊ पवार,जिल्हा पदाधिकारी श्री. स्वप्नील मोरे, श्री. विवेकभाऊ चौधरी, श्री.अरूण पाटील,जेष्ठ आघाडी अध्यक्ष श्री. दिलीप काका गवळी,व्यापारी आघाडी उपाध्यक्ष श्री.किशोर रणधीर,विजाभज तालूकाध्यक्ष श्री. दिनकर राठोड, यूवामोर्चा शहराध्यक्ष श्री. भावेश कोठावदे,श्री. बंडूनाना पगार, श्री. विशालभाऊ सोनवणे,श्री. खूशाल दादा पाटील आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे उत्पन्न पूर्णतः वाया गेले, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री व नेत्यांनी हेक्टरी २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतची मदत शेतकऱ्यांना देण्याचे वचन दिले मात्र प्रत्यक्षात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदती व्यतिरिक्त एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यातच या कर्जमाफीचे पैसे कधी मिळणार याबद्दल शास्वती नसताना त्याआधीच शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने शेतकरी जास्त खचणार आहे. तरी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सदर बाबतीत तात्काळ कार्यवाही न झाल्यास आम्ही आक्रमक पद्धतीने आंदोलन करू याची नोंद घ्यावी असा इशाराही त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.






