Chandrapur

वाघाने अडविला शेतकऱ्यांचा रस्ता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत

वाघाने अडविला शेतकऱ्यांचा रस्ता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत

कोरपना मनोज गोरे

पारडी विभागातील रूपापेट शेत्रातील सावलहीरा शिंगार पठार घाटराई टांगाळा जांभुळदरा या परिसरात अनेक धबधबे आहेत पावसाळा असल्याने धबधबे ओसंडून वाहत आहेत मात्र या परिसरात सध्या वाघांचा वावर वाढला त्यामुळे त्या परिसरात येण्यावर वन विभागाने पर्यटकांना बंदी घातली आहेत तसेच मांगलहिरा रूपापेठ या परिसरात वाघाने धुमाकूळ घातल्याने काही दिवसापूर्वी एका गाईला फस्त केले सध्या या परिसरात वागोबा ठाण मांडून आहेत अनेक शेतकऱ्यांनी वाघाला पाहिले असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.गुराखी जनावर चारताना त्यांच्या देखत वाघाने गाय फक्त केली या परिसरातील शेतकरी शेतावर जाणे येणे बंद केले आहेत वन विभागाने सावधानतेचा इशारा म्हणून जंगलात कुणीही फिरवू नयेत असे आव्हान केले आहेत या भागातील जंगलात परिसरात अनेक धबधबे आहे पावसाने ते उसळून वाहत आहेत मात्र वाघांचा वावर असल्याने पर्यटकांना येथे येण्यास मनाई करण्यात आली आहेत या जंगलव्याप्त क्षेत्रात सावलहीरा सिंगरपठार रूपापेठ पार्डी परसोडा रूपापेट ही गावे येतात या गावातील शेतकऱ्यांनी शेती जंगलाला लागूनच आहेत मात्र वाघाच्या भीतीने शेतकरी शेतात जाण्यास मागेपुढे बघत आहेत तेव्हा वन विभागातील तात्काळ बंदोबस्त लावून वाघाला पकडण्यास उपाययोजना कराव्या अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहेत तेव्हा विभाग यावर काय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button