Amalner

सद्यस्थितीचे सामाजिक भान राखत उपक्रमशील शिक्षकांनी केले रक्तदान

सद्यस्थितीचे सामाजिक भान राखत
उपक्रमशील शिक्षकांनी केले रक्तदान

अमळनेरला ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शिवशाही फाऊंडेशनचा उपक्रम

योगेश पवार

अमळनेर- कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. आरोग्य मंत्र्यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते. त्या आवाहनास ओ देत तसेच काळाची पाऊले ओळखत शिवशाही फांऊडेशनच्या वतीने माणूसकीचा वसा जपत उपक्रमशिल शिक्षक पुढे आले. त्यांनी रक्तदान करुन कृतियुक्त सामाजिक संदेश दिला. यावेळी या शिक्षकांनी “मानवतेची कास धरुया..कोरोनाला हद्दपार करुया” असा संकल्पही केला.

सध्याच्या स्वार्थी युगात प्रत्येक व्यक्ती हा आपला स्वार्थ साधत असतो अशा या गोष्टींना तिलांजली देत उपक्रमशील शिक्षक तथा शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक डी.ए.धनगर, आर्मी स्कुलचे प्रा.शरद पाटील, उपक्रमशिल प्राथमिक शिक्षक विशाल देशमुख, आर्मी स्कुलचे गणित शिक्षक गोपाल हडपे, शिवशाही फाऊंडेशनचे सचिव तथा आर्मी स्कुलचे शिक्षक उमेश काटे यांच्यासह स्वप्नील संभाजी पाटील व निखिल विजय बोरसे हे समाजातील गरजूसाठी रक्तही द्यायला तयार झाले. अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे डोस देणारे शिक्षक यांनी कृतीतून रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान आहे हे दाखवून दिले. रक्तदान करणारे शिक्षक ही बदलत्या समाजाची नांदी म्हणावी लागेल. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, जीवनश्री रक्तपेढीचे संचालक संतोष पाटील, मंडळ अधिकारी व्ही पी पाटील ,तलाठी एम पी भावसार ,पी एस सोनवणे, पी पी चव्हाण ,वाल्मिक पाटील उपस्थित होते. यावेळी तहसीलदार वाघ यानी शिवशाही फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान ज्यावेळी देशावर नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती आल्यास शिक्षक हे पुढे येतील. ते आपल्या कृतीतून समाजासमोर व विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण करतील एवढे मात्र निश्चित!
————
अमळनेर- रक्तदान करताना उमेश काटे. शेजारी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व शिवशाही फाऊंडेशनचे पदाधिकारी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button