Chalisgaon

गिरणा नदी पात्रातील महसूल बुडवून चोरटी वाळू वाहतूक तात्काळ बंद न झाल्यास ;  बेमुदत अर्ध नग्न आंदोलन !!!

गिरणा नदी पात्रातील महसूल बुडवून चोरटी वाळू वाहतूक तात्काळ बंद न झाल्यास ; बेमुदत अर्ध नग्न आंदोलन !!!

रयत सेनेचे प्रांताधिकारी यांना निवेदन ; नियुक्त तलाठी व सर्कल यांचे फोन टॅप करून सीडीआर काढावा !

मनोज भोसले

चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव तालुक्यात गिरणा नदीपात्रातून कुठेही वाळूचा ठेका देण्यात आलेला नाही तरीही गेल्या अनेक महिन्यांपासून रोजच शासनाचा लाखो रुपये महसूल बुडवून वाळू वाहतूक थांबण्याचे नाव घेत नाही थोडक्यात अवैध वाळू वाहतुकीने अक्षरशा कळस घातला आहे. मागील काळात हिंगोणे या एकाच गावातील नदीपात्रातून केवळ एका वाळूमाफियाने तीन ते चार महिने कालावधीत (7.5) ऑन रेकॉर्ड साडे सात कोटी रुपये किमतीची वाळू उत्खनन व वाहतूक केली होती परंतु या ठिकाणी वेगवेगळे 50 वाळूमाफिया एकत्र येऊन जामदा, रहिपुरी, वडगाव लांबे ,मेहुणबारे इत्यादी नदीपात्रातून दर हप्त्याला ( सात दिवसात ) जवळपास दोन कोटी रुपये , तर दरमहा ( 30 दिवसात ) आठ कोटी रुपये किमतीच्या वाळूचे अवैध उत्खनन व चोरटी वाहतूक केली जात असल्याचे प्रांतधिकरी यांना दि १५ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

एकाच वेळी रोजच पन्नास ट्रॅक्टर हे गिरणा नदीपात्रात उतरून वाळू वाहतूक करीत आहेत .जामदा रहिपुरी वडगाव लांबे नदीपात्रातून रात्रभर वाळूचे उत्खनन व चोरटी वाहतूक उघडपणे सुरू आहे. त्यामुळे रोजच शासनाचा हजारो रुपयांचा महसूल बुडवून शासनाला चुना लावला जात आहे .रात्री-अपरात्री भरधाव व सुसाट वेगाने होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे , अनेक निरपराध लोकांनी नाहक त्यांचे प्राण गमावले आहेत. अनेकदा मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली आहे . शासनाने लाखो , करोडो रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे .चाळीसगाव महसूल चे काही अधिकारी तलाठी व सर्कल शासनाने प्रदान केलेले कर्तव्य व कर्तव्यप्रति असलेले त्यांचे उत्तरदायित्व न बजावता बसल्याजागी निर्लज्जपणे हप्ते लाच घेऊन वाळू माफियांचे पाठीराखे बनले असल्याची चर्चा आहे.

गिरणा नदी पात्रातील गावांमध्ये नियुक्त तलाठी व सर्कल यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा सी.डी.आर (CDR) काढावा , तसेच त्यांचे कॉल टॅप करण्यात यावे जेणेकरून हे दिवसभर व रात्रभर कोणाशी व कितीदा वाळूमाफियांची संपर्क साधतात, हे निष्पन्न होऊन सत्य आपोआप समोर येईल. भरधाव व सुसाट वेगाने चालणाऱ्या ट्रॅक्टरांच्या खडखडाट व भर्रर्र…..भर्रर्रर्रर्रर्र आवाजाने गिरणा नदीलगतच्या गावातील नागरिकांची अक्षरश झोप उडाली आहे. नागरीक अक्षरशः त्रासले / वैतागले आहेत .निर्ढावलेल्या / मस्तवाल अशा वाळू माफियांच्या मुसक्या आवळून तात्काळ राष्ट्रीय नैसर्गिक संपत्ती असलेल्या वाळूचे महसूल विभागाने जतन व संवर्धन न केल्यास , येत्या काळात कधीही व केव्हाही तहसील कार्यालयासमोर बेमुदत अर्ध नग्न साखळी आंदोलन केले जाईल , याची शासनाने नोंद घ्यावी . दिलेल्या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार सह तालुकाध्यक्ष राकेश रामदास निकम व इतर कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button