Chandwad

काँग्रेसच्या प्रशिक्षण व प्रबोधन कार्यक्रम समितीत सदस्यपदी श्रीमती उत्कर्षा रुपवते

काँग्रेसच्या प्रशिक्षण व प्रबोधन कार्यक्रम समितीत सदस्यपदी श्रीमती उत्कर्षा रुपवते

उदय वायकोळे चांदवड

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकत्याच गठित करण्यात आलेल्या प्रदेश “प्रशिक्षण व प्रबोधनपर कार्यक्रम समिती” सदस्यपदी श्रीमती उत्कर्षा रुपवते यांची निवड केल्याबद्दल प्रांत-अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मा. बाळासाहेब थोरात यांचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत.उत्कर्षा रुपवते या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य असून रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांच्या भाची आहेत.त्या समाजकारण व राजकारणात अतिशय सक्रिय असून शिर्डी लोकसभा या (अ जा राखीव)मतदारसंघातुन कॉंग्रेसपक्षाकडून 2024 ची निवडणूक लढविणेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.आमचे प्रतिनिधी उदय वायकोळे यांनी त्यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की
काँग्रेस पक्षाने दिलेल्या संधीशी एकनिष्ठ राहून मी काम करत राहीन.आठ दिवसांपूर्वी महिला आयोगाने नंदूरबार जिल्हा दौरा केला होता त्यात उत्कर्षाताई यांनी विविध वसतिगृहे निवासी शाळा येथे भेट देऊन स्वतः त्या ठिकाणचे भोजन करून पाहिले होते,यावरून त्यांची समाजातल्या प्रत्येक घटकाविषयीची तळमळ स्पष्ट होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button