Chalisgaon

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यासाठी १००० अँटिजेन किट मान्यवरांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यासाठी १००० अँटिजेन किट मान्यवरांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द

कोविड केअर सेंटर ला औषधी व अँटिजेन किटचा तुटवडा येत्या ८ दिवसात कमी करून अजून ५० बेड उपलब्ध करणार – आमदार मंगेशदादा चव्हाण

नितीन माळे

चाळीसगाव – शहरासह तालुक्याभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे मात्र रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक औषधी व लक्षणे आढळलेल्या रुग्णांची तातडीने तपासणी करून निदान करण्यासाठी हव्या त्या प्रमाणात अँटीजेन किट उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.अश्या परिस्थितीत कोरोना काळात जनसेवेसाठी नेहमीच एक पाऊल पुढे राहणारे चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी तातडीने आपल्या आमदार निधीतून रु.५ लाख किंमतीच्या १००० अँटीजेन किट चाळीसगाव तालुक्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच येत्या ८ दिवसात अजून २००० अँटीजेन किट, आवश्यक औषधी जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यासाठी पत्र दिलेले आहे. सर्वाधिक ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असलेले जिह्यातील चाळीसगाव येथील एकमेव डेडीकेटेड कोविड केअर सेंटर असून अजून ५० बेड कोविड केअर सेंटर येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिली. आज उपलब्ध करण्यात आलेले १००० अँटीजेन किट भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी – कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे व वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी भाजपा किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, नगराध्यक्षा
सौ.आशालताताई विश्वास चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, गटनेते संजय रतनसिंग पाटील, माजी पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, नगरसेवक सोमसिंग राजपूत, चिराग शेख, अरुण अहिरे, भास्कर पाटील, नगरसेविका सौ. विजयाताई प्रकाश पवार, बाळासाहेब मोरे, आनंद खरात, चंदू तायडे, महिला आघाडी शहराध्यक्ष सौ.संगीताताई गवळी ग्रामीण सरचिटणीस धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस अमोल नानकर, प्रज्ञावंत आघाडी तालुकाध्यक्ष जगदीश सूर्यवंशी, माजी नगरसेवक निलेश महाराज, कैलास पाटील, राम पाटील, युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष कपिल पाटील, सिद्धार्थ राजपूत, सुनिल पवार, राजू पगार, दीपक राजपूत, धनंजय सूर्यवंशी, आदित्य महाजन, निखिल पवार जगदीश चव्हाण, डॉ. अभिजित देशमुख, समुपदेशक रणजीत गव्हाळे आदी उपस्थित होते.कोरोना काळात भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी – पदाधिकारी जनतेसाठी फिल्डवरलॉकडाऊन सुरू झाल्यापासून चाळीसगाव तालुक्यात अन्नसेवा, औषधी फवारणी, आर्सेनिक अल्बम वाटप, मास्क वाटप आदी माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी -पदाधिकारी हे सदैव फिल्डवर असून यात अनेकांना कोरोणाची बाधा देखील झाली. मात्र स्वतःच्या जीवावर उदार होत त्यांनी सेवा बजावल्याचे कौतुक आमदार मंगेश चव्हाण यांनी केले तर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे चाळीसगाव चा कोरोना रुग्णांचा मृत्युदर देखील कमी झाल्याने खऱ्या अर्थाने ते कोरोना योद्धे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी कोविड केअर सेंटर मधील कोरोना रुग्णांची विचारपूस करून तेथील सोयी सुविधांची पाहणी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button