विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी
शेळावे तालुका पारोळा येथील शेतकरी ज्ञानेश्वर संतोष सांगळे वय 24 हे काल तारीख 27 रोजी रात्री आपल्या मोहाडी शिवारातील शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले होते. रात्री अंधाराच्या वेळी ते विहिरीत पाय घसरून ते पाण्यात पडल्याने व बुडल्याने मृत झाल्याची घटना घडली आहे. ते आज पहाटे घरी न आल्याने घरच्यांना अस्वस्थ वाटले व तातडीने त्यांनी व ग्रामस्थांनी शेतात धाव घेतली व त्यांच्या शोध घेतला असता ते विहिरीत पडले असल्याचे दिसून आले. त्याच वेळी कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले.
याबाबत गोकुळ सांगळे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे व पुढील तपास हवालदार रवींद्र रावते हे करीत आहे.






