Chalisgaon

आमदार मंगेश चव्हाण सतत फिल्ड वर कार्यरत

आमदार मंगेश चव्हाण सतत फिल्ड वर कार्यरत

धनंजय ठोके (विधिज्ञ – औरंगाबाद उच्च न्यायालय)

लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून आमदार मंगेश चव्हाण यांनी वर्क फ्रॉम होम न करता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून थेट फिल्डवर काम करणे पसंत केले त्यामुळे ते दररोजच त्यांच्या कार्यालयातून महसूल, पोलीस, आरोग्य विभागातील अधिकारी, व नगरपालिका प्रशासन यांच्याशी संपर्क साधून, वेळोवेळी बैठका घेऊन करोना मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीशी सामना करण्यासाठी ते करत असलेल्या कामाची माहिती घेऊन सूचना व मार्गदर्शन करीत आहेत. थेट फिल्डवर काम करीत असल्यामुळे त्यांना फर्स्ट हॅन्ड व खरी माहिती मिळते त्यामुळेच ग्राउंड रियालिटी कळते. त्यामुळेच ज्यांच हातावर पोट आहे जे रोज काम करून आपली गुजराण करतात “रोज कमाव रोज खाव” या पद्धतीने ज्यांची जीवन जगण्याची पद्धती आहे व तसेच काही लोकांची परिस्थिती यापेक्षा भयंकर असून ते भिक्षा मागून गुजराण करीत असतात परंतु करोना मुळे अचानक उद्भवलेल्या ह्या परिस्थितीत या लोकांना दोन वेळचे अन्न मिळेनासे झाले या ग्राउंड रिॲलिटी ची जाणीव झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे आमदार मंगेश चव्हाण हे महाराष्ट्रातील पहिले आमदार आहेत ज्यांनी स्वखर्चाने या लोकांना दोन वेळचं जेवण फुड पॅकेट त्यांच्या जनसेवा कार्यालयाच्याच्या माध्यमातून पुरवण्याचा स्तुत्य व माणुसकीची ओळख देणारा उपक्रम चालू केलेला आहे. निवडणुकीच्या काळातच नव्हे तर निवडणूक जिंकल्यावर देखील मिशन मोडवर असलेले व जनसेवेसाठी कायमच मिशन मोडवर राहणारे आमदार मंगेश चव्हाण याचा मला मतदार व सुजान नागरिक म्हणून सार्थ अभिमान आहे. आमदार नव्हे जनसेवक अशी त्यांची नवीन ओळख या निमित्ताने आपणास झालेली आहे.
Proud to be associated with MLA Mangesh Ramesh Chavan.
जय हिंद जय महाराष्ट्र

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button