Nanded

सलगरा फाटा ते बेटमोगरा रस्त्याच्या कामाची तपासणी गुणनियंत्रण कक्ष औरंगाबाद मार्फत करण्यात यावी – भारत सोनकांबळे यांची मागणी एक महिन्यापासून रस्त्याचे काम रखडले.

सलगरा फाटा ते बेटमोगरा रस्त्याच्या कामाची तपासणी गुणनियंत्रण कक्ष औरंगाबाद मार्फत करण्यात यावी – भारत सोनकांबळे यांची मागणी
एक महिन्यापासून रस्त्याचे काम रखडले.

नांदेड प्रतिनिधी :- वैभव घाटे

मुखेड तालुक्यातील सलगरा फाटा ते बेटमोगरा या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली होती पण बेटमोगरा येथील नवतरुण युवा नेतृत्व करणारे व
सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे
सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज, निवेदने देऊन संबधित प्रशासनाला धारेवर धरत या सलगरा फाटा ते बेटमोगरा हा रस्त्याचे काम चालू करण्यास प्रशासनाला भाग पाडले. सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी पाठपुरावा केलेल्या प्रयत्नाला यश जरी मिळाले असले तरीही गेली एक ते दीड महिना संपला या रस्त्याचे प्राथमिक स्वरूपाचे काम म्हणजेच खराब झालेला रस्ता जेसीबीच्या सहाय्याने रोड उखरले न उखरले त्या च्यावरच दबई करून थातूरमातूर स्वरूपाचे व निकृष्ट दर्जाचे काम संबंधित गुत्तेदार व इंजिनियर यांच्या मार्फत होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सलगरा फाटा ते बेटमोगरा रस्त्याच्या कामाची तपासणी गुणनियंत्रण कक्ष औरंगाबाद मार्फत करण्यात यावी - भारत सोनकांबळे यांची मागणी एक महिन्यापासून रस्त्याचे काम रखडले.

गेली महिनाभरापासून या रस्त्याच्या कामाला उतरती कळा लागली असून कामाची गती
मंदावली असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप
उफळून आल्याचे दिसून येत आहे.
या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य मोठ्याप्राणावर पसरले असल्याने नागरिकांसह वाहन चालकांच्या
आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुखेड तालुक्यातील सलगरा फाटा ते बेटमोगरा हा 11 किलोमीटरचा अंतर असून या रस्त्याचे काम मुखेड येथील चौधरी कॉन्ट्रॅक्टशेन यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

सलगरा फाटा ते बेटमोगरा रस्त्याच्या कामाची तपासणी गुणनियंत्रण कक्ष औरंगाबाद मार्फत करण्यात यावी - भारत सोनकांबळे यांची मागणी एक महिन्यापासून रस्त्याचे काम रखडले.

जवळपास एक महिनाभरापूर्वी
कंत्राटदार विलास चौधरी यांच्या मार्फत विविध यंत्रसामुग्रीच्या लवाजम्यासह काम सुरू तर झाले व सुरुवातीचे दोन ते तीन दिवसच प्राथमिक स्वरूपाचे थातुर मातुर काम करण्यात आले. यामध्ये अंदाजत्रका नुसार काम न करता गुतेदार व इंजिनिअर यांच्या मनोमिलनाणे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे व यावरती कसल्याच प्रकारची व्यवस्थितरीत्या मुरूम व गिटी चा पुरेपूर समावेश करण्यात न करताच लाल,पांढरी माती मिश्रीत मुरूम आणि गिटी चा वापर करून रस्त्याची दबई करण्यात आली असल्याने सद्यस्थितीत या मार्गावर गिटी आजूबाजूला पसरलेल्या अवस्थेत दिसून येत आहे.परंतु गेली महिनाभरा पूर्वी या रस्त्याचे काम चालू झालेले सद्या बंद अवस्थेत दिसून येते.

महिनाभरा पूर्वी कंत्रादारांमार्फत या रस्त्यावर मुरूम टाकून ठेवला आहे पण त्यावर पाणी न टाकल्यामुळे रोडवरील अवजड वाहनांमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य वाढून पडचाऱ्यासह रोड शेजारील शेतकरी व शेतमजूर तसेच दुचकीस्वार यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यासाठी रोडवर टाकलेल्या मुरुमावर दैनंदिन पाण्याचा शिंतोडा टाकणे गरजेचे असताना ही कंत्रादारांकडून जाणीवपूर्वक पाणी न टाकता धुळीच्या खाईत माणसांना लोटून मानवी आरोग्याशी खेळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

अंदाजपत्रक प्रमाणे खोदकाम न करता सदर कंत्राटदाराने जुन्याच रोडवर जैसे थे अवस्थेत त्यावर थातूरमातूर मुरूम व गिटी टाकल्याने कामाचा दर्जा काय असेल हे सांगण्याची तूर्त गरज नसल्याचेही भारत सोनकांबळे यांनी सांगितले.
आणि या रस्त्याच्या कामाची तपासणी ही गुणनियंत्रण कक्ष औरंगाबाद कार्यालयामार्फत करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून व
सोनकांबळे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button