Chalisgaon

भुजल फाउंडेशन तर्फे आयोजित, तुफान सेनेची धमाल शाळा’ हा उपक्रम

भुजल फाउंडेशन तर्फे आयोजित, तुफान सेनेची धमाल शाळा’ हा उपक्रम

मनोज भोसले

भुजल फाउंडेशन तर्फे आयोजित, *तुफान सेनेची धमाल शाळा*’ हा उपक्रम दिनांक 17 जानेवारी, 2020 पासून सुरू झाला. पहिलाच कार्यक्रम चिंचगव्हाण येथील माध्यमिक विद्यालय येथे घेण्यात आला. माननीय प्रतिभा ताई मंगेश चव्हाण यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून, सुरुवात करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना पाणी आडवा पाणी जिरवा, संदर्भात जास्तीत जास्त आणि सखोल ज्ञान मिळावे, तेही खेळ गाणे यांच्या स्वरूपात. म्हणून हा उपक्रम घेण्यात आला. त्याचबरोबर दुसरा कार्यक्रम दहिवद माध्यमिक विद्यालय येथे घेण्यात आला. आणि खर्‍या अर्थाने अभियानाला सुरुवात झाली. विद्यार्थी तसेच दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, आणि कर्मचारी यांचा उत्तम असा प्रतिसाद लाभला. त्याचबरोबर संबंधित गावातील जलमित्र आणि जलयोद्धे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे मदत केली. या कार्यक्रमासाठी संपूर्ण भूजल टीम चाळीसगाव, यांनी परिश्रम घेतले. आणि आता प्रत्येक गावागावात एक तुफान सेना करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button