Bid

?️ पारधी समाजातील तिघांची निर्घुण हत्या करणाऱ्या हल्लेखोरांना फाशीचीच शिक्षा द्या —– बिरसा क्रांती दल

पारधी समाजातील तिघांची निर्घुण हत्या करणाऱ्या हल्लेखोरांना फाशीचीच शिक्षा द्या
—– बिरसा क्रांती दल

अनील पवार

यवतमाळ – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मांगवडगांव येथे पारधी समाजातील तिघांची सुनियोजनपूर्वक, कटकारस्थान रचून निर्घुण हत्या करण्यात आली. या हल्लेखोरांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री, ग्रुहमंत्री व पोलीस महासंचालक यांना संघटनेने ई- मेल द्वारे निवेदन पाठविले आहेत.निवेदनाच्या सुरुवातीलाच
अमानुषपणे करण्यात आलेल्या हत्यांचा संघटनेने जाहीर निषेध नोंदविला आहे.

निवेदनात म्हटले की,केज तालुक्यातील मांगवडगाव शिवारात असलेल्या ‘ पंधरा एकर बारा गुंठे ‘ जमिनीच्या मालकी हक्कावरुन निंबाळकर व पवार यांच्यात बराच जुना वाद होता. या वादात दोन तीनदा पारधी समाजाच्या कुटुंबावर हल्ले करण्यात आले. पण मात्र दखल घेण्यात आली नाही.
या जमिनीवर दावा करत निंबाळकर यांनी २००६ मध्ये लाकडाने व गजाने मारहाण केल्याने पवार कुटुंबातील काही सदस्यांना जायबंदीही व्हावे लागले.

जीव जाईल या भितीच्या धाकाने त्यांनी मांगवडगाव सोडून अंबाजोगाई येथे राहायला आलेत. मिळेल तो कामधंदा करुन जगू लागले व जमिनीसाठी न्यायालयात लढा देत होते असे कळते.

या जमिनीचा निर्णय दोन वर्षांपूर्वी पवार यांच्या बाजूने लागल्याने, ती जमिन कसण्यासाठी त्यांनी तीन महीण्यापूर्वीच बीडला जावून पोलीस संरक्षण मागितल्याचेही कळते.मात्र त्यांना पोलीस संरक्षण मिळाले नाहीत. १३ मे रोजी अंबाजोगाई वरुन मांगवडगाव येथे शेतात जाण्यासाठी निघाले असतांनाही युसूफ वडगाव येथे थांबून पोलीस स्टेशनला संरक्षण मागितले होते पण त्यांना तेथेही संरक्षण मिळाले नाहीत.

पवार कुटुंब शेतात आले. ते आता जमिनीचा ताबा घेणार असे निंबाळकर गटाला कळले. लगेच त्यांनी सुनियोजन केले,कटकारस्थान रचले आणि आता यांच्या शरीराचा फडशा पाडून जीवच घ्यायचा हा बेत आखून , यातून कोणाचाही जीव वाचू नयेत ,पवार कुटुंबातील सदस्य पळून जावू नयेत म्हणून जमावाने असलेल्या या हल्लेखोरांनी पहिल्यांदा त्यांच्या मोटार सायकली जाळून टाकल्या. आणि नंतर तिक्ष्ण हत्यारांनी हत्यासत्र सुरु केले.यात बाबू शंकर पवार,प्रकाश बाबू पवार, संजय बाबू पवार यांना निर्दयपणे,अत्यंत क्रुरतेने ठार मारुन हत्या करण्यात आल्यात. तर कुटुंबातील काही सदस्य गंभीर जखमी झालेत.

मा.न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही आदिवासींना तो हक्कच बहाल होऊ नये . एवढी क्रुर व निर्दयी व्यवस्था येथे अस्तित्वात आहेत. आपल्या हक्कासाठीही येथे जीव गमवावा लागतो. यापलीकडे पुन्हा येथे काय असावे ? असाही प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे.
जमावबंदी असतांनाही मोठ्या संख्येने हल्लेखोरांनी एकत्र येवून नियोजन पूर्वक हत्या केलेल्या आहे.

त्यामुळे हल्लेखोरांवर खुनाच्या गुन्ह्यासह, अँट्रोसिटी अँक्ट जमावबंदीसह इतरही कठोर गुन्हे नोंदवून , या प्रकरणाचा निकाल तात्काळ लागावा म्हणून सदर प्रकरण फास्ट ट्रँक कोर्टात चालवावे. या खटल्यातून गुन्हेगार सुटू नयेत म्हणून चांगला वकील द्यावा. कोणत्याही परिस्थितीत हल्लेखोरांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.अशी मागणी
बिरसा क्रांती दलाने सरकारकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button