India

?भय लघुकथा अतृप्त…

भय लघुकथा अतृप्त…

प्रा जयश्री दाभाडे..

©भयाण शांतता पसरली होती चहूकडे… निशब्द वातावरण…पानांची सळसळ देखील मोठा आवाज वाटावा इतकी..काळा कुट्ट अंधार,ढगाळलेला आसमंत,किर्रर्र अंधार…अमावस्येची रात्र…ती अचानक दचकून जागी झाली.. एकटीच होती…शरीर पूर्णपणे घामाने निथळलेलं…डोकं सुन्न झालेलं…जाग का आली हे न समजणार कोडं.. स्वप्न पडलं की कोणाची तरी चाहूल लागली हे तिच्या लक्षात येईना..वीज गायब झालेली…ती डोकं हातात घेऊन खाली मान घालून सावरण्याचा प्रयत्न करत असलेली…हळूहळू सावरू लागलेली..

अचानक तिला कोणाची तरी चाहूल लागली तशी ती घाबरली….भितीने थरथर कापत आगपेटी शोधण्याचा प्रयत्न करू लागली…परंतु हाताशी काही मेणबत्ती आणि काडे पेटी लागली नव्हती.?त्यातच ही चाहूल तिने हळूच कानोसा घेतला…पण आता पुन्हा निरव शांतता पसरली होती… अगदी मघाशी लागलेली चाहूल भास वाटावा इतकी…

ती हळूच स्वयंपाक घरापर्यंत काडी पेटी आणि मेणबत्ती शोधण्यासाठी थरथर कापत जाऊ लागली…तशी तिला पुन्हा कुणाची तरी चाहूल लागली… पण मोठ्या कष्टाने तिने स्वयंपाक घरातुन मेणबत्ती आणून लावली आणि थोडा प्रकाश पसरला शयनगृहात.. तशी थोडी सावरली आणि आपल्याला जाग का आली ह्याच उत्तर शोधू लागली…

मेंदू काम करू लागल्यावर तिला दोन गोष्टी समजल्या एक तर तिला स्वप्न ही पडलं होतं आणि चाहूल ही लागली होती.. कोणी तरी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतं.. तिने आजूबाजूला कानोसा घेण्याचा प्रयत्न केला पण काहीच समजलं नाही…हळूहळू डोळे जड झाले आणि ती झोपेच्या स्वाधीन झाली…

हाच प्रकार सातत्याने घडू लागला…स्वप्न,अनामिक चाहूल तीच जागं होणं ..ह्यात आता एक चेहरा तिला दिसू लागला…. तिला कळेना काय करावे?.. कोणला सांगावे?..तिची घुसमट होऊ लागली.. तब्येतीवर परिणाम होऊ लागला.. ती हळूहळू खंगत चालली..विचार,भिती,दडपण,सतत कोणी तरी नजर ठेवत असल्याची जाणीव यामुळे तिच्या दैनंदिन व्यवहारात खूपच मोठा परिणाम घडून आला….

अस्वस्थता आणि निराशा यामुळे तिचं निरागस आणि लोभस सौंदर्य फिक पडू लागलं….आणि एक दिवस अचानकपणे तिने तिची गाडी काढली …कोणत्या तरी अनामिक ओढीने ती जणू सर्व काही ठरल्या प्रमाणे माहीत असल्या प्रमाणे शहरापासून दूर असलेल्या एका प्राचीन वाड्या जवळ जाऊन पोहचली….एका विशिष्ठ वातावरणात गेल्यानंतर तिला अचानक खूप उत्साही वाटू लागलं… जणू तिच्या जीवनातील परमोच्च सुखाचा क्षण येऊन ठेपला असावा..

आत शिरताच तिला अनेक गोष्टींचा उलगडा झाला…तो ती तिची वाट पाहत होता… अतृप्त होता…अधुरा होता तिच्या शिवाय…अनेक वर्षे, शतकानुशतके अधुरी राहिलेली त्यांची प्रेम कहाणी…पूर्णत्वाला येणार होती….तीही अतृप्तच होती अनेक वर्षे.. पण तिला कळलंच नाही… आज सर्वच गोष्टींचा उलगडा तिला झाला…एक ओढ…विचित्र, अनामिक अतृप्त पणा तिच्या नसा नसात भिनलेला….

आज मात्र ती अगदी सहज,दडपण नसलेली,त्यामुळे अधिकच मोहक आणि सुंदर दिसणारी…तो ही त्याच ओढीने तिच्या साठी ताटकळत थांबलेला…आज ती ओढ..ती भेट..जन्म जन्मांतरीची… समर्पण देण्याची तयारी…आणि ही प्रेम कहाणी पूर्ण होण्याच्या मार्गावर.. पण….???

प्रेम म्हणजे काय? असा प्रश्न अनेक वेळा उपस्थित होतो.शारीरिक संबंध, वासना,स्वार्थ की जन्मोजन्मी ची ओढ..तरल भावना…पारदर्शक असलेली…काय असतं नेमकं? कोणालाचं याचं उत्तर देता येत नाही…. मानो तो प्यार निभाने वाले गर बरसो इंतजार कर सकते हैं ..या फिर ये वो बंधन हैं जो पल टूट जाता हैं… या फिर कई जन्म लग जाते हैं इस अधुरे शब्द को जानने में…सच कहेते लोग प्यार का पहला शब्द ही अधुरा हैं ये कब किसका पुरा हुवा हैं….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button