Chimur

सागवान चोरणाऱ्यांना 24 तासात चार आरोपींना केली अटक ठाणेदार धुळे यांनी केली कारवाई

सागवान चोरणाऱ्यांना 24 तासात चार आरोपींना केली अटक
ठाणेदार धुळे यांनी केली कारवाई

चिमूर ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या स्थानिक चिमूर येथील नथ्यू तळवेकर यांचे शेत काग बाम्हणी शेत शिवारात असून त्यांच्या शेतातून 75 हजार रुपयांचा सागवान माल अज्ञात चोरांनी चोरून नेला असता फिर्यादी तळवेकर यांच्या तक्रारीवरून ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी आरोपींना 24 तासाच्या आत अटक करून गुन्हा नोंदविला.

चिमूर येथील नथ्यू तळवेकर यांच्या शेतातील सागवान माल चोरीचा गेल्यावर चिमूर पोलीस स्टेशन ला तक्रार केली असता ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी छडा लावीत कारवाई करीत लवकरच आरोपींना अटक केली.
पो. स्टे. चिमूर. अप. क्रमांक १९७/२०२०, कलम ३७९, ३४ भादवि. चे गुह्यात फिर्यादी नत्थु बालाजी तळवेकर. राहणार चिमूर यांचे मौजा काग (बामणी) येथील शेत शिवारातून तोडून चोरून नेलेले सागवान लाकुड. किं. ७५,००० रुपये चा मालासह आरोपी गुणवंत खुकसू धोंगडे. वय ५० वर्ष. विट्ठल भाउराव मसराम. वय २६ वर्ष. विनायक वसंता धोंगडे. वय ५० वर्ष. मारोती गोविंदा रामटेके वय ३२ वर्ष. सर्व राहणार मौजा काग (बामणी), तह. चिमूर यांच्या २४ तासांच्या आत शोध घेऊन मुद्देमाल ताब्यात घेतले व आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली. सदरचा तपास . तारे उपविभागीय पोलिस अधिकारी. तथा स्वप्नील धुळे. पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोहवा डोनु मोहुर्ले. नापोशी दिनेश सूर्यवंशी. पोशि विशाल वाढई यानी केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button