आहार विहार आचार विचारातून शतायुषी व्हा
डॉ. अविनाश सावजी यांचे प्रतिपादनउमंग व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद : आरोग्याच्या कांनमत्रांनी रसिक श्रोते तृप्तमनोज भोसलेचाळीसगाव — आपल्यातील आहाराच्या काही सवयी बदलाव्या लागतील.कारण घरकामासाठी बाई, कार्यालयात शिपाई यामुळे मनुष्याच्या जीवनातील शारीरिक श्रम दिवसेंदिवस कमी होत असताना व्यायामासाठी वेळ द्यावा लागेल. जो जाड दिसतो त्याला तब्येत सुधारल्याचा दाखला आपण देतो एखादा सडपातळ असेल तर काही टेंशन आहे का अशी विचारपूस करतो मुळातच जाड होणारे शरीर विकाराचे माहेरघर आहे. आपली प्रत्येक कामे करण्यासाठी माणसे ठेवता येतील परतू आपल्या वाट्याचा व्यायाम करण्यासाठी माणूस कामाला ठेवता येत नाही त्यासाठी आपणच आपला व्यायाम करावा लागेल. सरासरी आयुष्यमान घटत असताना सावध होण्याची वेळ आली आहे. आपला आहार विहार आचार विचार बदला त्यातून शतायुषी होता येईल असे परखड मत डॉ.अविनाश सावजी यांनी आज येथे व्यक्त केली. खासदार उन्मेश दादा पाटील आणि उमंग परिवाराच्या वतीने आयोजित उमंग व्याख्यानमालेच्या दुसरे पुष्प गुंफताना डॉ सावजी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार उन्मेश दादा पाटील,नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी विकास नवाले,केशव कोतकर, वसंतराव चदात्रे,के बी दादा साळुंखे, डॉ.नरेश निकुंभ, महिला आयोग माजी सदस्य देवयानी ठाकरे, दुय्यम सचिव डॉ. संजय देशमुख,उमंग परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील ,लालचंद बजाज,नगरसेविका विजया प्रकाश पवार, नगरसेविका विजया पवार,नगरसेवक नितीन पाटील,डॉ. गिरीश मुंदडा, डॉ.गजेंद्र अहिरराव, डॉ. सुजित वाघ, डॉ. अर्चना पाटील, डॉ. शशिकांत राणा, डॉ. योगेश पोतदार, योगेश भोकरे, रवी शिरोडे, सुधीर चव्हाण, सुभाष बजाज ,सुधीर चव्हाण, प्रेमसिंग पवार, संदीप बेदमुथा ,महेश वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे भाजप युवा मोर्चा पदाधिकारी यांनी स्वागत केले.संपदा पाटील यांनी आपल्या प्रास्तविकातून व्याख्यानमालेचा प्रवास मांडला.याप्रसंगी कुस्तीगीर सोपान माळी, काँप्युटर इंजिनियरींगची गुणवंत विद्यार्थिनी सिद्धी मालतकर,सौरभ ओतारी यांचा गौरव करण्यात आला. आजवर महाराष्ट्रातील शेकडो गावांत, हजारो कुटुंबांमध्ये आणि लाखों लोकांच्या हृदयाशी थेट संवाद साधला त्याच्याशी झालेल्या कृतीयुक्त अनुभूती मधून अनेकांच्या गंभीर आजारावर त्यांना नियंत्रण मिळविता आले याची अनेक उदाहरणे त्यांनी श्रोत्यां समोर मांडली.आजारी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा मुळात आजारीच पडू नये, यासाठी काय करायला हवं? हे सांगतांना केवळ शरीरावर उपचार करणे पुरेसे नाहीत, तर मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्यासंदर्भातही विचार व उपचार केल्यानेच निरामय तसेच स्वस्थ जीवन जगणे शक्य आहे, अशी एक नवीन सूत्र त्यांनी रसिक श्रोत्यांसमोर मांडले.१०० वर्षांचे निरामय सार्थक आयुष्य जगण्यासाठी सहज अंमलात आणता येतील, अशी सोपी सूत्रे त्यांनी सांगितली.श्रोत्यांच्या हृदयाला हात घालत त्यांना शतायुषी जीवनाच्या टिप्स दिल्यात .सूत्रसंचालन आभार शालीकराम निकम यांनी मानले






