Chalisgaon

चाळीसगावच्या एकदंताला निरोप भक्तिमय वातावरणात दुमदुमले शहर, विविध कार्यक्रमाचा समारोप

चाळीसगावच्या ‘एकदंताला’ निरोप
भक्तिमय वातावरणात दुमदुमले शहर, विविध कार्यक्रमाचा समारोप….

चाळीसगावच्या एकदंताला निरोप भक्तिमय वातावरणात दुमदुमले शहर, विविध कार्यक्रमाचा समारोप

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” अश्या भावूक करणाऱ्या घोषणाबाजी ने चाळीसगाव च्या एकदंताला निरोप देतांना शहराला भक्तीमय स्वरूप आले होते. एकदंत कला कलामोहोत्सवा निमित्त घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे समारोप करण्यात आले.

चाळीसगावच्या एकदंताला निरोप भक्तिमय वातावरणात दुमदुमले शहर, विविध कार्यक्रमाचा समारोप

या समारोप कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर युवनेते मंगेश दादा चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी नगराध्यक्ष अण्णा वाघ,विश्वास चव्हाण, योगाचार्य वसंत चंद्रांत्रे,जेष्ठ चित्रकार  श्री. बाविस्कर सर, नगरसेविका संगीत गवळी, नगरसेवक सोमसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे, भास्कर पाटील, शेखर बजाज, चिराउद्दीन शेख, नानाभाऊ कुमावत,राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक निलेश राजपूत, मा.पं. स. शेषराव बापू, सतीश पाटे, मार्केट कमिटी सभापती रवी आबा, मनोज साबळे, जिल्हा बँक संचालक राजुभाऊ राठोड, रा.स.प. जिल्हा अद्यक्ष श्री.शिंगाडे, सरपंच अनिल नागरे, माजी सरपंच  अंबु दादा पाटील, धनंजय ठोके, राजेंद्र पगार, देवा भाऊ, कोमल जाट, खुशाल पाटील, अजय जोशी, मनोज गोसावी, सुनील निकम, शार्दूल बाविस्कर, अरुण पाटील, रोहन सूर्यवंशी, निलेश सराफ, जितू वाघ, राजू मांडे, दीपक राजपूत, शांताराम पाटील, अण्णा गवळी, सुनील पवार, उपसरपंच  श्री.शेकडे, जेष्ठ कवी रमेश पोतदार, सरदार राजपूत व पत्रकार बांधव उपस्थित होते. या वेळी मंगेश दादा चव्हाण यांनी म्हटले की, गेले दहा दिवस न चुकता आपण या कलामोहोत्सवात उपस्थित दिली.

चाळीसगावच्या एकदंताला निरोप भक्तिमय वातावरणात दुमदुमले शहर, विविध कार्यक्रमाचा समारोप

आपल्यामुळेच हा एकदंत कलामोहोत्सव अभूतपूर्व ठरला असून मी आलेल्या सर्व भाविकांचे आभार मानतो. त्यांनतर एकदंत कलामोहोत्सव लकी ड्रॉ चे शंभराहून अधिक बक्षिसे भाविकांना देण्यात आली. सूत्रसंचालन भावेश कोठावदे यांनी केले तर आभार मंगेश चव्हाण मित्र मंडळ यांनी मानले. त्यांनतर कार्यक्रमाची सांगता होऊन एकदंताच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. महिलांनी रस्त्यांवर सप्तरंगी रांगोळ्या काढून या मिरवणुकीची शोभा वाढवली तर भाविकांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अश्या घोषणा दिल्या. ढोल ताश्यांच्या गजरात वाजतगाजत भक्तांनी गणरायाच्या मूर्तीला निरोप देण्यात आला यामुळे शहराला भक्तिमय स्वरूप आलेले होते.

………………………….
भाविकांनी मानले मंगेश दादांचे आभार
एकदंत कलामोहोत्सवाचे आयोजन करून अतिशय उत्तम पद्धतीने पार पडल्यामुळे शेकडो भाविकांनी मंगेश दादा चव्हाण यांचे आभार मानले. भाविकांनी दाखवलेला विश्वास पाहून मंगेश दादा देखील भावूक झालेले दिसून आले.
भाविक भारावले
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या कलामोहोत्सवात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील भाविकांनी या कलामोहोत्सव चांगलाच जल्लोष केला होता.परंतु या कार्यक्रमाचा समारोप व आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देतांना भाविक भारावून गेलेले होते.
महिलांनी धरला ठेका
गणरायाच्या मिरवणुकी दरम्यान महिलांनी फुगड्या खेळत विविध गाण्यांवर ठेका धरला असून यातुन ‘स्त्री’
स्वातंत्र्याचा संदेश देण्यात आला.
चाळीसगांवचा_एकदंत_निरोप बक्षिस_समारंभ लकी_ड्रॉ चाळीसगांवचा_एकदंत २०१९

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button