Chalisgaon

हिरापूर येथील रेल्वे भुयारी मार्ग समस्या :समन्वय समितीच्या निवेदनानंतर रेल्वे प्रशासनाची दखल: केले सर्वेक्षण

हिरापूर येथील रेल्वे भुयारी मार्ग समस्या :समन्वय समितीच्या निवेदनानंतर रेल्वे प्रशासनाची दखल: केले सर्वेक्षण

चाळीसगाव नितीन माळे

चाळीसगाव : तालुक्यातील हिरापुर येथे असलेल्या रेल्वे भुयारी मार्गाचे काँक्रिटीकरण काम व्हावे किवा पर्यायी उपाययोजना करावी यासाठी हिरापुर रेल्वे पूल समन्वय समितीतर्फे खासदार उन्मेश पाटील यांना साकडे घातले होते याची त्वरीत दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने सर्वेक्षण केले व रहदारी साठी काय उपाययोजना करता येईल याबाबत समन्वय समिती सदस्यांशी प्रत्यक्ष जागेवर जाऊन सविस्तर चर्चा केली. पंचक्रोशीतील हिरापुर, ब्राम्हणशेवगे, पिंपळवाड, तमगव्हाण, माळशेवगे, हातगाव, अंधारी, नाईकनगर, शेवरी इ.गावांचा एकमेव रहदारी मार्ग असल्याने या गावांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागते आहे.पावसाळ्यात या भुयारी मार्गात पाणी साठते रस्त्याचा अंदाज येत नसल्याने तसेच फरशीवरचे दगडही गुळगुळीत व खराब झाल्याने रेल्वे अंडर पास येथून प्रवास करणेही धोक्याचं झाले आहे. पाणी साचून राहिल्याने विशेषत: पावसाळ्यात मोठे हाल होतात. विदयार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांची हेळसांड होते. ही वस्तुस्थिती असून तातडीने रेल्वे अंडर पासची समस्या मार्गी लावावी असे आदेश वजा सूचना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला केल्या होत्या.
चाळीसगाव येथील हिरापूर स्टेशन जवळ असलेल्या रेल्वे भुयारी मार्गाबाबत असलेल्या समस्येबाबत आज समन्वय समितीतर्फे निवेदन देण्यात आले होते. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला काम त्वरीत मार्गी लाववण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने रेल्वे प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने सर्वेक्षण केले याप्रसंगी रेल्वेचे मंडळ ईजिनिअर पंचमसिग जाटम, सहाय्यक सेक्शन ईजिनिअर एस.एस.केदार यांनी प्रत्यक्ष हिरापुर येथील रेल्वे भुयारी मार्ग पाहणी करून सर्वेक्षण केले. याप्रसंगी हिरापुर येथील भैयासाहेब पाटील, सरपंच सुधीर शिंदे, संता पहिलवान, अनिल कापसे,मा.सरपंच मधु शिंदे, भाईदास पाटील,पांडूरंग निकम, रंजना आबा वराडे, अनिल माळे,नितीन माळे, एकनाथ राठोड, सुभाष कापसे, ज्ञानेश्वर राठोड, अजय मोरे,लाला पठाण, माळशेवगेचे मा.सरपंच प्रताप पाटील, ब्राम्हणशेवगे येथील सोमनाथ माळी,विष्णू राठोड, मनोहर पाटील व समन्वय समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button