Pandharpur

समाजसेवक संजय बाबा ननवरे यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले

समाजसेवक संजय बाबा ननवरे यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : कोरोना विषाणूशी आज संपूर्ण जग लढत आहे अशा कठीण प्रसंगात ज्यांनी समाजातील लोकांनसाठी अतुलनीय कार्य केले असे पंढरपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय बाबा ननवरे यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला यासाठी संभाजी ब्रिगेड सार्वजनिक शिवजन्मोत्सव च्या वतीने छत्रपती शिवाजी राजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.कोरोना कालावधीमध्ये अनेकांना अन्नधान्याची किट, मोफत जेवण, पिण्याचे पाणी, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आपले कर्तव्य बजावनाऱ्या व्यक्तींना आज जिजामाता उद्यान येथे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या वेळी बोलताना संजय बाबा म्हणाले की
पंढरपूर शहरांमधील कोरोना च्या काळामध्ये प्रत्येक माणसाला हाताला काम नव्हते अशात मी माझ्या स्वखर्चाने लाॅकडॉऊन मध्ये अन्नधान्य व आर्थिक मदत केली. समाजात वावरत असताना आपणही समाजाचे काही देणे लागत आहोत याचा बंद ठेवला पाहिजे प्रत्येकाने व हाच बंद ठेवून मी माझ्या कमाईतील 100 रुपये मधले 40 रुपये समाजामध्ये देणे लागत आहे. असा विचार करून प्रत्येकाने समाजातील लोकांना मदत सार्वजनिक योजना सुरू करण्याची आवश्यकता आहे अशी प्रतिक्रिया संजय बाबा ननवरे यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button