?️ अमळनेर कट्टा… महिला दिनानिमित्त महाराणी येसूबाई महिला बचत गटाची स्थापना राजमुद्रा फाउंडेशन चे लाभले सहकार्य
अमळनेर : ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, महिलांच्या सबलीकरणासाठी शासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत असते.
याचाच एक भाग म्हणून
राजमुद्रा फाउंडेशन व श्याम पाटील (आरोग्य सभापती न.प.अमळनेर) यांच्या वतीने ढेकू रोड व पिंपळे रोड परिसरात महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचे उद्योग-व्यवसायात सबलीकरण व आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या हेतूने महाराणी येसूबाई बचत गट,महाराणी सईबाई बचत गट व याव्यतिरिक्त इतर ५ बचत गटांची स्थापना करण्यात आली.तसेच यावेळी उपस्थित महिलांना गृहपयोगी वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या.
भविष्यात ढेकूरोड-पिंपळेरोड परिसरातील महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या व्यापक असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राजमुद्रा फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत, व्यावसायिक प्रशिक्षणाची सोय करण्यात येईल,यावेळी आरती शाम पाटील, रोशनी वाघ,जयमाला बेहरे, लीना पाटील, हर्षदा पाटील,सुधा पाटील,प्रीती पाटील,सुनंदा ठाकरे, रेखा पाटील,ज्योती भालेराव,सीमा पाटील,संगीता पाटील, माधुरी पाटील,भावना पाटील, प्रियांका पाटील,स्वाती पाटील या सर्व महिला उपस्थित होत्या तसेच बचतगट व महिला उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी मुख्य समन्वयीका सौ.आरती शाम पाटील यांना खालील मोबाइल क्रमांकावर 8857093009 संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






