Chimur

चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत  फिर्यादिस बोलाऊन केला परत गरीब शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत फिर्यादिस बोलाऊन केला परत गरीब शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर

चिमुर : दिनांक 20 में रोजी फिर्यादि शंकर नत्थु बोबडे व्य 50 वर्ष राहणार बाम्हनी यानी पोलिस स्टेशन चिमुर येथे एक लाख 11 हजार 600 रूपयाचा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार केली होती, सदर गुन्हाची चौकसी पोलिस उप नीरीक्षक अलीम शेख यांचे पथकाने गुह्यातील आरोपिचा शोध घेऊन चोरीस गेलेली मालमत्ता एक सोन्याचा गोफ वजन 14,900 मिली ग्राम कीमत 13 हजार रुपये, एक सोन्याचा गोफ व लाकेट वजन 15,470 ग्राम कीमत 14 हजार रुपये, एक सोनयाची बादामी आंगटी वजन 4110 ग्राम कीमत 4 हजार रुपये, व अन्य सोन्याच्या वस्तु सहित 20 हजार रुपये रोकड़ असा ऐकून 1 लाख 11 हजार 600 रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला,
सदर गुह्यातील फरयादी शंकर बोबडे हे गरीब शेतकरी असून त्यानी आयुष्यभर स्वकष्टने कमावलेली मिळकत पोलिसांचे अथक परिश्रमाने व मोठ्या शिताफिने परत मिलविली, सदर मालमत्ता न्यायालयांच्या आदेशाने उपविभागीय पोलिस अधिकारी नितिन बगाटे यांचे हस्ते पोलिस नीरीक्षक रविन्द्र शिंदे व तपास अधिकारी पोलिस उप नीरीक्षक अलीम शेख, केलास आलम यांचे उपस्तित प्रदान करण्यात आली व फिर्यादिस चोरीस गेलेली मालमत्ता परत मिळउन देऊन त्यांच्या जीवनातील आनंद परत मिळऊन दिला,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button