Amalner

धरण जनआंदोलन  समितीचा कोणत्याही राजकिय पक्षाशी  कोणासही पाठिंबा नाही

धरण जनआंदोलन समितीचा कोणत्याही राजकिय पक्षाशी कोणासही पाठिंबा नाही

अमळनेर( )धरण जनआंदोलन समिती अराजकीय असल्याने समितीचा कोणत्याही राजकिय पक्षाशी अथवा अपक्षाशी संबंध नसल्याने समितीचा कोणासही पाठिंबा नाही.धरण पूर्ण होईपर्यंत समिती सतत संघर्ष करत राहील असे पत्रक समितीतर्फे काढण्यात आले आहे.पाडळसे धरण जनआंदोलन संघर्ष समितीची अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमिका ठरविण्यासाठी महत्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली.
पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या आक्रमक भूमिकेमुळे धरणाचा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. यापार्श्वभूमीवर पाडळसे धरण जनआंदोलन संघर्ष समितीची नुकतीच महत्वपूर्ण बैठक समितीच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन सर्वानुमते ठरविण्यात आले की,पाडळसे धरण जनआंदोलन समितीचा अमळनेर विधानसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही.धरणपूर्ती साठी समितीची भूमिका ही सातत्याने संघर्षाची आहे.आणि पाडळसे धरण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जनआंदोलन समिती सतत संघर्ष च करत राहील.पाडळसे धरण पूर्ण करणे हेच जनआंदोलन समितीचे अंतिम ध्येय आहे असे सर्वानुमते ठरले.या बैठकीत समितीचे सुभाष चौधरी,प्रा.शिवाजीराव पाटील,हिरामण कंखरे,अजयसिंग पाटील, एस.एम.पाटील,महेश पाटील,एन.के.पाटील,योगेश पाटील, रविंद्र पाटील, रणजित शिंदे,रामराव पवार,सुनिल पाटील,प्रशांत भदाणे , हेमंत भांडारकर, देविदास देसले,पुरुषोत्तम शेटे, सतिष काटे,सतिष पाटील,सुनिल पवार,प्रभाकर पाटील, प्रकाश पवार आदिं समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.समितीच्या वतीने उपस्थित सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने पत्रक प्रसिद्धीस देण्यात आलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button