Amalner

जळोद येथे शिरीषदादा चौधरी यांचा हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

जळोद येथे शिरीषदादा चौधरी यांचा हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

अमळनेर रजनीकांत पाटील
तालुक्यातील जळोद येथे मा आ शिरीष दादा चौधरी यांचा हस्ते त्यांचा कार्यकाळात मजूर व शिफारस केलेल्या तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण नुकतेच करण्यात आले.

जळोद येथील विकासाचा 50 वर्षांचा विकासाचा बॅकलॉग मा आ शिरीष दादा चौधरी यांचा मार्फत सरपंच जितेंद्र चौधरी यांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावा करून भरून काढला आहे.

यामधील भोई समाज समाज मंदिर ,व्यायाम शाळा,रस्ता काँक्रीटीकरण या आधी झालेल्या कामाचे लोकार्पण दादांनी केलेल्या शिफारशी तुन मंजूर कामाचे भूमिपूजन त्या पेव्हर ब्लॉक बसविणे रस्ता काँक्रीटीकरण करणे यसरपंच याच्या वैयक्तिक खर्चातून 10 सिमेंट बाक या सर्व विकासकामांचे भूमिपूजन मा आ शिरिषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला सरपंच जितेंद्र चौधरी उपसरपंच सौ शारदा कोळी , प्रवीण पाठक नगरसेवक तथा गटनेता न पा अमळनेर
श्रीराम चौधरी मा नगरसेवक सुभाष चौधरी ,मा नगराध्यक्ष पंकज चौधरी जि नि स सदस्य, बाळासाहेब संदानशिव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. तर येणाऱ्या काळात कोळी बांधवांसाठी समाजमंदिर उभे करू असे आश्वासन यावेळी बोलताना मा आ शिरिषदादा चौधरी यांनी दिले.यशस्वीतेसाठी सदस्य हिरामण सोनवणे शशिकांत साळुंखे श्रावण भिल उषाबाई साज चौधरी जनाबाई कोळी लक्ष्माबाई भिल सुनीता पारधी अर्जुन कोळी अशोक शिरसाठ पो पा विलास सोनवणे ग्रा सेवक निलेश चौधरी एम डी चौधरी सर पी डी चौधरी बापूजी कोळी नाना भोई भारत भोई रघुनाथ चौधरी सुरेश चौ आदींनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button