?️अमळनेर कट्टा…धक्कादायक.. लोण बु येथे आढळला पुरुषाचा मृतदेह..!घातपात असल्याची शक्यता..!प्रेत उचलू देण्यास गावकऱ्यांचा विरोध…!
अमळनेर येथील लोण बु येथे शेतात एका इसमाचे प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर इसमाचा रवींद्र देवराम पाटील उर्फ छोटू आण्णा असे सदर व्यक्ती चे नाव असून वय अंदाजे 50 वर्षे आहे. शेतात जाण्याच्या रस्त्यावरून वाद झाला असल्याने घातपात झाला आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी सदर ठिकाणी उपस्थित झाले असून या प्रकारचा निर्णय लावावा अशी मागणी केली जात आहे.






