Amalner

?Big Breaking…तलाठीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन

?Big Breaking…तलाठीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन..

16/10/2020 रोजी अवैध वाळु वाहतुक करणा-याने पथकातील तलाठी यांचेवर
केलेल्या हल्ल्याबाबत तहसीलदार मिलींद वाघ यांना निवेदन देण्यात आले.

वाडीचौक येथे सकाळी 6.00 वाजता अवैध गौणखनिज वाहतुक करणा-यांवर कारवाई करणेसाठी म. तहसिलदार अमळनेर यांच्या तोंडी आदेशान्वये श्री.तिलेश अशोक पवार श्री.प्रकाश बारकु महाजन, श्री. बळीराम नामदेव काळे,श्री सतिष अशोक शिंदे श्री प्रदिप अशोक अदाणे,श्री महेश सुभाष अहिरराव,श्री मधुकर राजधर पाटील हे सकाळी 6.00 वाजेचे सुमारास अमळनेर शहरातील बाड़ी चौकात अवैध वाळु
वाहतुकीस आळा घालण्यासाठी गेले असता अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रक्टरचा मालक संदिप बापु भोई( मोरे) उर्फ खली रा.पैलाड याने पयकातील तलाठी यांचेशी धक्काबुक्की व शिविगाळ केली व सरकारी कामात अळथळा आणला.सदर घटनेचा अणळनेर तालुका तलाठी संघ निषेध करत असुन घटनेबाबत अमळनेर
पोलीस स्टेशन येथे भारतीय
संहिता कलम 353,379,504,506,188,341,34 नुसार कायदेशीर फिर्याद दिली आहे. सदर घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी अमळनेर तालुका तलाठी संघ करत असुन आरोपींना अटक न झालेस दिनांक 19/10/2020 पासुन अमळनेर तालुका तलाठी संघ नैसर्गीक आपत्ती,कोव्हीड 19 व
निवडणुक कामकाज वगळता लेखणी बंद आंदोलन करणार आहोत.तसेच दिनांक 21/10/2020 पावेतो
आरोपीना अटक न झालेस अमळनेर उपविभागातील तालुके नैसर्गिक आपती कोव्हिडं 19 निवडणुक कामकाज वगळता लेखणी बंद आंदोलनात सहभागी होतील.तरी शेतकरी बांधवांना हाणान्या अडचणी
बाबत अमळनेर तालुका तलाठी संघ दिलगीरी व्यक्त करत आहे.
यापुर्वी देखील अशा स्वरूपाच्या घटना झाल्या असुन वारंवार दिलेल्या निवेदनामध्ये अवैध
गौण खनिज कार्यवाहीसाठी जाणाऱ्या पथकास शासकिय वाहन व पोलीस संरक्षणाची मानणे केलेली आहे. तरी या निवेदनाद्वारे अशी विनंती करण्यात येते कि अवैध गौणखनिज कार्यवाही करणेकामी जाणाऱ्या पथकाबाबत शासनाने जे सुचना व निर्देश दिलेले आहेत त्यापमाणे कार्यवाही स जातांना संरक्षण मिळावे. अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर अध्यक्ष गणेश महाजन,उपाध्यक्ष वाल्मिक पाटील,कार्याध्यक्ष स्वप्नील कुलकर्णी, सचिव मुकेश दिसले इ च्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button