Pandharpur

करकंब ग्रामीण रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सुखरूप प्रसुती

करकंब ग्रामीण रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सुखरूप प्रसुती
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर सध्या देशभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पहावयास मिळत आहे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील होऊन बसले आहे.रुग्णालयात जाताच कोरोना चाचणी करावी लागते नंतर ऍडमिट करून घेतले जाते महिला रूग्ण पॉझिटिव्ह असेल तर बाळंतपण सुखरूप होणे ही कसोटी व धाडसाचे ठरते परंतु करकंब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.तुषार सरवदे व स्टाफ यांनी करकंब येथे मंगळवारी पॉझिटिव्ह महिलेचे बाळंतपण सुरक्षित व सुखरूप करून दाखवले आहे देशात आरोग्यविभाग सर्वांत मोलाची कामगिरी करत आहे.वाढत्या कोरोना केसेस मुळे दवाखाने रुग्णांनी गच्च भरली आहेत अशातच या काळात बाळंतपणा साठी दवाखाना मिळणे व मिळाला तर तिथे कोरोना संसर्ग होणार नाही याची भीती असते खाजगी रुग्णालयात बाळंतपणासाठी अव्वाच्या सव्वा बिले असतात.रुग्ण पॉझिटिव्ह असेल तर त्यावर यशस्वी उपचार करणे हे एक डॉक्टरांसाठी एक जोखमीचे व धाडसाचे ठरते परंतु हे सर्व करकंब ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.तुषार सरवदे व स्टाफने हे शक्य करून दाखवीले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अविश्रांत सेवा बजावणारे डॉ.तुषार सरवदे ज्यांनी सहा ते सात वर्षांमध्ये जिल्हाभरात जवळपास 30 हजार दुर्बिणीद्वारे बिनटका कुटुंबकल्याण यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.या कामगिरी मुळे प्रत्येक वर्षी त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने प्रथम क्रमांक पुरस्कार मिळाले आहेत.कोरोना दुसऱ्या लाटेत त्यांनी करकंब रुग्णालयात ७ सीझर १४ बाळंतपण केले आहेत.नुकतीच आष्टी येथील महिला बाळंतपणासाठी कॉटेज हॉस्पिटल पंढरपूरला गेली या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्या महिलेला सोलापूर शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी रेफर केले. तिथे गेल्यावर या महिलेच्या नातेवाईकांनी करकंब येथे बाळंतपणासाठी चौकशी करून करकंब ग्रामीण रुग्णालयात सोमवारी दाखल केले प्रचंड अनुभव असलेले डॉ. तुषार सरवदे यांनी परिस्थिती ओळखून या महिलेस रुग्णालयात ऍडमिट करून घेतले मंगळवारी सकाळी या महिलेची कोरोना चे सर्व नियम पालन करीत महिलेला पीपीई किट परिधान करायला लावून रुग्णालयातील सहकारी सिस्टर अनिता कांबळे व आदेश साखरे यांना आवश्यक ते मार्गदर्शन करून अनिता कांबळे यांनी ही सूचनांचे पालन करीत पीपीई किट परिधान करून या महिलेची सुखरूप प्रसूती केली ही महिला व जन्मास आलेली कन्या आता सुखरूप असल्याने रुग्णांच्या नातेवाईक यांनी करकंब ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार सरवदे,सिस्टर अनिता कांबळे,आदेश साखरे व सम्पूर्ण स्टाफचे आभार मानले.करकंब आरोग्य विभागाच्या यशस्वी कामगिरी मुळे प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button