Ratnagiri

शिक्षकांचे पगार वेळेवर द्या,पगारास विलंब करणार्यां अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करा सीईओ यांना सुशीलकुमार पावरा यांचे निवेदन..

शिक्षकांचे पगार वेळेवर द्या,पगारास विलंब करणार्यां अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करा सीईओ यांना सुशीलकुमार पावरा यांचे निवेदन..

रत्नागिरी : प्राथमिक शिक्षकांचा पगार वेळेवर द्या व पगारास विलंब करणारे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी इंदूराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,ऑनलाईन वेतन प्रणालीनूसार महिन्याच्या 1 तारखेला मागील महिन्याचा पगार देणे अपेक्षित आहे. माञ गेल्या काही महिन्यांपासून प्राथमिक शिक्षकांचा पगार हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हा परिषद रत्नागिरीकडून दिला जात आहे. ही एक गंभीर बाब आहे. त्यामुळे काही शिक्षकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच विमा हप्ते भरणे,लाईट बील भरणे,गृहकर्ज हफ्ता,वाहनकर्ज हफ्ता,शैक्षणिक कर्ज हफ्ता,दूधवाल्याचे पैसे देणे,उधारी देणे इत्यादी थकित झाल्यामुळे शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेळेवर पगार जमा न झाल्यामुळे अनेक शिक्षकांना गृहकर्ज हफ्ता,विमा हफ्ता इत्यादी ठिकाणी जादा रक्कम द्यावी लागणार आहे. बिरसा क्रांती दल संघटनेकडे तशा व्यथा काही शिक्षकांनी मांडल्या आहेत. जानेवारी, फेब्रुवारी हे महिने आर्थिक व्यवहाराचे वर्षातील शेवटचे महिने नाहीत तरी जिल्हा परिषद रत्नागिरी कडून जाणीवपूर्वक प्राथमिक शिक्षकांना पगार देण्यास विलंब होत आहे. जानेवारी महिन्याचा पगार आजअखेरही झाला नाही. ही एक चिंताजनक बाब आहे. डाक विभाग, बॅन्क विभाग इत्यादी विभागात 1 तारखेच्या आत पगार दिला जातो,तर आमच्या प्राथमिक शिक्षकांना पगार देण्यास महिन्याचा शेवटचा आठवडाच का लागतो? याचे मार्गदर्शन व्हावे. शिक्षकांच्या प्रपंचाचा विचार करण्यात यावा.पगारास विलंब करणारे कर्मचारी व अधिकारी यांच्या वर कडक कारवाई करावी व प्राथमिक शिक्षकांचे पगार दरमहा वेळेवर देण्यात यावेत.अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button