Ahamdanagar

शिर्डीच्या बिरोबा बनातील भविष्य वाणी,जो देवाच्या आज्ञेत राहील त्याला देव फुलावाणी झेलील…?

शिर्डीच्या बिरोबा बनातील भविष्य वाणी,जो देवाच्या आज्ञेत राहील त्याला देव फुलावाणी झेलील…?

संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीच्या साईबाबांच्या बिरोबा बनातील भक्त हरिभाऊ हेमा बनकर यांनी बिरोबा यात्रेत होईक सांगितले ते पुढील प्रमाणे- पुढील वर्षी काही ठिकाणी म्रुग नक्षत्रात पाउस होईल,तर काही ठिकाणी थोरल्या आणि धाकट्या कौरात कमीजास्त प्रमाणात पाउस होईल.काही ठिकाणी कमी होईल तर काही ठिकाणी ओढेनाले वाहतील, काही ठिकाणी भयंकर राढा होईल, पोलिस डोळ्याने पाहतील आणि कानाने ऐकतील, माय लेकरांना ध्यानाआड होताच काही ठिकाणी पिडा होईल, काही ठिकाणी नुसते आभाळ फिरेल, तर काही ठिकाणी कौल ढीलाईचा होउन नापाक होईल, काही ठिकाणी फक्त हारळ उगेल,काही ठिकाणी रक्ताचा पूर वाहिल,आणि जो देवाच्या आज्ञेत राहील त्याला देव फुलावाणी झेलील अशी भविष्य वाणी वर्तविण्यात आली.या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे,बिरोबा भक्त रतीलाल लोढा काका, मनोज लोढा, मिरीचे बिरोबा भक्त सिताराम भगत,आसाराम भगत,तानाजीराव धसाळ, महेश लोढा,माजी नगराध्यक्ष कैलास कोते,रामभाऊ दातिर, शिर्डीचे डी.वाय.एस.पी. संजय सातव, मोहन काळे यांच्या सह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले भाविक भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री नउ वाजता सुरु झालेले वाद्यकाम पहाटे पाच वाजेपर्यंत चालू होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button