Nashik

ए आई एम आय एम औरंगाबाद जिल्हा कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबिर संपन्न

ए आई एम आय एम औरंगाबाद जिल्हा कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबिर संपन्न

मौलाना डाॅ.अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक औरंगाबाद प्रतिनिधी:- प्रमुख मार्गदर्शक औरंगाबाद खासदार जलील तसेच औरंगाबाद जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, औरंगाबाद जिल्हा युवा अध्यक्ष मुनशी भैया पटेल, पारदे दादा, युवा जिल्हा कार्याध्यक्ष जावेद नवाज खान आणि सर्व तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये
कार्यकर्ता मेळावा ठेवण्याचे विशेष कारण म्हणजे कार्यकर्ता व पदाधिकारी यांचे एकमेकांसोबत संवाद व्हावा व कार्यकर्त्यांनी पक्षाला अधिक बळकट व पक्ष वाढीसाठी कसे काम करावे या उद्देशाने शहर जिल्हा तसेच तालुका व गावातील तळागळापर्यंत पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य लोकांपर्यंत कसे पोचवता येईल या उद्देशाने या कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन चे आयोजन मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रावर आयोजित करण्यात आले होते.

*पुन्हा खासदार इम्तियाज जलील हेच व्हावे यासाठी जिल्हाभर पायाला भिंगरी लावून पळणार – समीर साजिद बिल्डर*

औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुशिक्षित आणि लोकसभेमध्ये जिल्ह्याचे प्रश्न मांडणारा पुन्हा एकदा विकास करणारा खासदार आपणास हवा आहे यासाठी इम्तियाज जलील यांना 2024 मध्ये खासदार बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी जिल्हाभर पायाला भिंगरी लावून पळणार असल्याचे या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर यांनी सांगितले

*लोकसभा निवडणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – मुंन्शी भैया पटेल*

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा खासदार निवडून आणण्यासाठी जिल्हाभर युवक सर्वात जास्त मेहनत घेतील आपला उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे युवा जिल्हाध्यक्ष मुन्शी भैया पटेल यांनी आपल्या मनोगतात सांगितले यापूर्वी देखील मेहनत घेऊन पक्षाचं नाव वाढवण्याचं काम नेहमीच युवकांनी केलेलं आहे आणि यापुढे देखील असंच पक्ष कार्य युवक निश्चितच करत राहतील असेही मुंन्शी पटेल म्हणाले

*कार्यकर्ता कसा असावा – जावेद खान*

औरंगाबाद जिल्हा कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रमाच्या वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की कार्यकर्ता पदाधिकारी कसा असावा पदाधिकारी यांचे पद येत जात असते पण कार्यकर्त्यांनी एकमेकांशी पक्षाच्या कार्याविषयी एकमेकाला सहकार्य करावे तसेच पक्षात काम करत असताना येणाऱ्या आळी अडचणीसाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी संघटित होऊन कार्य करत राहावे. म्हणजेच आपल्या शहरातील, वार्डातील, तालुक्यातील इतर आपापल्या क्षेत्रात कुठल्याही कार्यासाठी आपण स्वतःहून सोडवलं पाहिजे याकरिता आपणच एक मोठा कार्यकर्ता आहे. असे समजून पक्षाच्या जवळच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन कुठल्याही विभागात जसे की शासकीय, निम्म शासकीय, पोलीस विभाग संबंधित असणाऱ्या सर्व कामे व समस्या आपण स्वतः सोडवलं पाहिजे आपल्या वरिष्ठ नेते यांना प्रत्येक कामासाठी वेळ मिळत नाही. त्याचबरोबर प्रत्येक समस्येला वरिष्ठ नेते यांना त्रास देणे ही बरोबर नाही. या गोष्टीची जाणीव प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी समजून घेतलं पाहिजे. येणाऱ्या पुढील सहा महिन्यात लोकसभा निवडणूक येणार आहे याकरिता जास्तीत जास्त आपल्या पक्षाच्या कार्याची कामे लोकांपर्यंत पोहोचून पक्षाचे ध्येय धोरण व सर्व जाती जमाती यांच्या हितासाठी पक्ष लढत आहे आणि त्यांच्या नेहमी पाठीशी आहे. लोकांना हे पटवून देण्यासाठी व या सर्व कामे एकनिष्ठ होऊन कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता लोकांच्या हितासाठी पक्ष त्यांच्यासोबत आहे. म्हणूनच चांगल्या नेत्याचे मार्गदर्शन गरजेचे आहे. पुन्हा खासदार इम्तियाज जलील यांना खासदार म्हणून पहायचे असेल तर आपण सर्वांनी जोमाने कामावर लागले पाहिजे तळागाळापर्यंत आपल्या कामाची व पक्षाची कार्याचे धोरण लोकापर्यंत पोचवलं पाहिजे. सर्व पक्षातील आपापल्या क्षेत्रात शहर असो किंवा ग्रामीण भागातील आप आपल्या ठिकाणी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आठवड्यातून एक दिवस कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा ठेवून मार्गदर्शन करण्यास खासदार इम्तियाज जलील यांना नियोजन करण्यास जिल्हा कार्याध्यक्ष जावेद नवाज खान यांनी विनंती केली.

*कोणाचीही जात पात न पाहता जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करायच आहे खासदार इम्तियाज जलील*

औरंगाबाद जिल्हा कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबिराला संबोधित करताना खासदार म्हणाले की आपल्याला कोणाचीही जात-पात न पाहता जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करायच आहे सर्व समाजाच्या सर्व घटकातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम दिल्ली दरबारी आपणास करायचे आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी वारंवार प्रश्न मांडण्याचे काम लोकसभेत मी करत आहे यापुढे देखील जनतेने संधी दिल्यास हे काम सतत करत राहील आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून दाखवेल सर्वप्रथम एम आय एम पक्षात काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांचे मनापासून आभार मानले व त्यांनी केलेल्या कार्य व पक्षाला बळकट करण्यासाठी ज्या प्रकारे परिश्रम केले ते निश्चितच कौतुक करण्यासारखे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.यासोबतच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेही या ठिकाणी त्यांनी आभार प्रकट करून त्यांचे कौतुक केले. आजच्या देशाच्या परिस्थितीचा उल्लेख करताना खासदार म्हणाले की आपल्या देशाला ज्या गोष्टीची गरज आहे. त्यामध्ये पक्षात काम करत असताना कुठल्याही कार्यकर्ता व पदाधिकारी याला कधीच वाटलं नाही पाहिजे की तो कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे फक्त त्यांनी आपल्या देशवासीयांना हितासाठी सर्व सामान्य लोकांसाठी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात उभा राहिला पाहिजे.
खासदार इम्तियाज जलील यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की आपले देश ज्या परिस्थितीतून जात आहे. ते मला योग्य वाटत नाही. ज्या अर्थाने देशात जे चाललेला आहे. देशापेक्षा आणि मानवच्या हितापेक्षा काही लोक जाती आणि धर्माला जास्त महत्त्व देत आहे. हे आपल्या सर्वांसाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे जातीपातीच्या नावावर एकमेकाचे रक्त सांडत आहे. हे बघून माझे मन दुखत आहे. असे आपले मत खासदार यांनी यावेळी सांगितले.
आम्ही लोकहितासाठी काम करत आहोत माणुसकी जपत आहोत याच्यापेक्षा चांगलं काम कोणतेही होऊ शकत नाही असेही मनोगत व्यक्त करण्यात आले.

*आदर्श बँक घोटाळा*
आदर्श बँकेच्या खातेदारांची अवस्था खूपच खराब आहे. त्यांची कुणीच मदत करणारा नेता व प्रशासन दिसून येत नाही. त्याचे काय कारण आहे ते मला माहित नाही. सरकार फक्त डोळे मिटून बघण्याची भूमिका घेत आहे. पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सुनावणी नाही आणि आदर्श बँक घोटाळा मधील सर्व दोषी आत्तापर्यंत अटक करण्यात आलेली नाही. असे असताना आदर्श बँकेतील खातेदारांचे हाल होत आहे. याची दखल घेत खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा आश्वासन दे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा प्रशासन जागी झाले खासदार इम्तियाज जलील आदर्श बँक घोटाळ्यात सामील असलेल्या सर्व दोषींना अटक करण्याची मागणी केली व आदर्श बँकेतील खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळवावे यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. तत्पर चार बँकेच्या चेअरमन व त्यांच्या सहकारणी यांना अटक करण्यात आली पण मात्र अजून काही दोषी पोलिसांच्या तावडीतून बाहेर असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. खासदार यांच्या महत्त्वाची बैठक घेऊन पोलिसांना सांगितले की येत्या पाच दिवसात बाकी राहिलेले दोषी यांना पण अटक करण्यात यावे. असा इशारा पोलीस प्रशासन यांना दिला.

*मणिपूर प्रकरण*
मणिपूर प्रकरणाविषयी खासदार यांनी सांगितले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात गेल्यानंतर विदेशाच्या मंचावरून सांगतात की मी भारतासाठी मोठमोठे उपकरण चालवतो लोकांसाठी अनेक योजना राबवण्यात आले आहे भारतात जातीपातीच्या कुठल्याही प्रकारचे भेदभाव नाही. महिलांचे आदर व सन्मान केले जात आहे पण मात्र नरेंद्र मोदी भारतात आल्यानंतर पार्लमेंट मध्ये येतात मीडियाला भेट देतात परंतु संसद भवन मध्ये येऊन मनिपुर मध्ये झालेल्या महिलांच्या वर होणाऱ्या अत्याचार दंगलीत झालेल्या जाळपोळ, मानवी हप्त्याच्या विषयी मन धारण करत असल्याचे सांगण्यात आले. मणिपूर मध्ये झालेल्या अन्याय अत्याचार याविषयी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन मध्ये येऊन या सर्व बाबींचा खुलासा व लोकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार सय्यद इम्तियाज जलील,मार्गदर्शक प्रभाकर पारदे ,जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर ,युवा जिल्हाध्यक्ष मुंन्शी भैया पटेल, युवा जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान ,गंगापूर तालुकाध्यक्ष राहुल वानखेडे ,कन्नड तालुकाध्यक्ष सलीम शहा, कन्नड शहर अध्यक्ष शंम्मू भाई, वैजापूर तालुका अध्यक्ष अखिल कुरेशी, वैजापूर शहराध्यक्ष वसीम खान, खुलताबाद तालुकाध्यक्ष मजीद मणियार, सोयगाव तालुकाध्यक्ष शेख राईस अखीर दादा, सिल्लोड तालुका अध्यक्ष फाईम पठाण ,पैठण तालुकाध्यक्ष मंजूर शेख, गंगापूर शहराध्यक्ष फैसल बालोसन, जिल्हा महासचिव शेख कलीम , आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी पश्चिम विधानसभा अध्यक्ष शोएब खान, मध्य विधानसभा अध्यक्ष भाई इम्तियाज खान, मध्य विधानसभा कार्याध्यक्ष अजहर पठाण, शोएब खान, रिजवान पठाण ,मुस्ताक सलामी, इरशाद खान, शेख गौस ,फैजान रिजवी ,मोहसीन खान, मोबीन शेख, इम्रान खान बुरहान पटेल, शेख साबेर, शोएब खान, मतीन पटेल ,इकबाल लाला, असद चाऊस, अनिस खान, कलीम खान ,वसीम अहमद, मोबीन टोपीवाला, जिशान पटेल ,अनिस पटेल, साबेर पटेल, अब्दुल्ला बिन हिलाबी, रफिक पटेल, सय्यद युसुफ, फिरोज खान, हाफीज कौसर ईशाती,शेख शाहरुख,अन्सार पटेल, नसीर पटेल ,शकील पटेल, अजहर पटेल, नजीर पटेल, आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन एम एम शेख यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button