Karnatak

औराद शाहजणी ते केतकी संगमेश्वर पर्यंत पदयात्रा

औराद शाहजणी ते केतकी संगमेश्वर पर्यंत पदयात्रा

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : सुमारे २२ वर्षांपासून महाराष्ट्र श्री सदगुरु विरुपाक्षेश्वर मठापासुन औराद शाहजणी ते दक्षिण काशी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या केतकी संगमेश्वर झहीराबाद (आंध्रा) पर्यंत औराद पासून गुरुवारी सकाळी सहा दिवस पदयात्रेला सुरुवात केली.
यावेळी हुलसूर परिसरात आगमन होताच फ्रेंड्स धाब्याचे मालक शिवकुमार म्हेत्रे यांनी सत्कार करून चहा नाष्टा ची वेवस्था केली.
या पदयात्रेला २२ वर्ष पूर्ण होत या वर्षी देशावर असलेल्या कोरोना संकटामुळे ४० ते ५० मोजक्या स्वरूपात काढत पदयात्रेचा उद्देश वर्षातून एकदा पायी चालत जावून आपल्या कुलदैवत प्राप्ती समर्पित करणे व जाती भेद प्रेम व्रध्दींगत करणे परस्परात सलोखा व सहकार्य भावना निर्माण ठेवणे एकमेकांच्या सुख दुखात सहभागी होणे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे टाळ मंर्दगांच्या गजरात नामजप घेत पदयात्रा सुरू झाली पहाटे संगीत शिवपाठ, प्रवचन, किर्तण, भजन असे नित्य कार्यक्रम आहेत.
यावेळी व्हि.एस.कस्तुरे सर, करबस स्वामी, बस्वराज सजनशेट्टी, त्रिंबक राघो, धुळाप्पा भतमुर्गे, रामलींग गस्तगार, रघुनाथ मंगशेट्टी, शिवप्रसाद मंगशेट्टी, देवप्पा हुमनाबादे,सुतार गुरुजी महिला कस्तुरा महानंदा, साधना भतमुर्गे, राघो गौरम्मा आदी पदयात्रेत सहभागी होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button