Chalisgaon

एक वटवृक्षाचा अंकुर कोमजू नये अन्न पाण्याविना

एक वटवृक्षाचा अंकुर कोमजू नये अन्न पाण्याविना

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले

– सोपान माळी … खेडी- (खेडगाव) तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव. एक अत्यंत छोट्याशा गावात जन्माला आला. आज नाव कमावलं पोरानं. महाराष्ट्र केसरी मध्ये 65 किलो गटात रौप्य पटकावलं…..
गावात शेतात काळी माती हा त्याचा आखाडा, आणि विहीर फोडण्याचा हातोडा एकमेव व्यायामाच साधन.

घरी अठरा विश्व दारिद्रय. आई वडील अकाली वृद्धत्व .. घरात एकटा कमवणारा .. दोन वेळच्या जेवणासाठी विहिर फोडायच काम. तेही मिळेल तेंव्हाच. शेतात मजुरी. दोन वेळा भाकरी आणि भाजी पोटभर मिळाली तरी खूप. अस असताना सोपान ला कुस्ती स्वस्थ बसू देत नव्हती. पौष्टीक खुराक तर लांब.. पण सोपान लढला, नुसता लढला नाही तर जिंकला.
गावात सत्कार झाले , चर्चा झाले, पेपरात फोटो आले पण पुढे काय? आज सोपान कडे एक विहीर फोडण्याचा ठेका आहे, नंतर बेकार.. ना रोजगार ना पैसे, तीच पोटाची वणवण पुन्हा.
सोपान ला पुढे गरज आहे आखड्याची आम्ही सरकार दप्तरी गेलो. पण स्पोर्ट हॉस्टेल ला ऍडमिशन साठी फक्त 20 वर्षाची अट… सोपानच वय 23, त्याला खुल्या गटात कुस्ती खेळायची पण कुटुंबातील तीन पोटाची भूक अडथळा ठरतेय.

आम्ही प्रयत्न करतोय जे शक्य होईल ते. सोपान मोठा व्हावा, त्याने नाव गाजवाव स्वतःच, कुटुंबाचं गावाचं , तालुक्याचं, जिल्ह्याचं राज्याचं.
या चाळीसगाव तालुक्याने विजय चौधरी च्या रूपाने तीन वेळा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राला दिलाय. त्याच मातीत असे अनेक महाराष्ट्र केसरी होऊ पाहताय. पण गरिबी अडवी येतेय.

आज सोपान तुमच्या सहकार्याने उभा राहिला तर या मातीत असलेल्या अनेक उद्याचे महाराष्ट्र केसरीच्या बीजाना अंकुर फुटतील

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button