Maharashtra

रावेर-यावल विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पार्टी च्या वतीने

रावेर-यावल विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पार्टी च्या वतीने दिनांक 09 जुलै 2020 गुरुवार रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजता* वर्चुअल सभेचे (ऑनलाईन सभा) आयोजन केलेले होते.

प्रतिनिधी सलीम पिंजारी

देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 2.0 सरकारच्या प्रथम वर्ष पुर्ती निमित्त रावेर-यावल विधानसभा मतदार संघाची ऑनलाइन सभा झाली. या ऑनलाइन सभेसाठी माजी पर्यटन मंत्री दोंडाईचे आमदार माननीय जयकुमारजी रावल हे विशेष करून मार्गदर्शन केले.जयकुमार रावळ यांनी भाजपा जिल्हा अध्यक्ष स्व.हरिभाऊ जावळे यांना श्रद्धनजली वाहून सभेला सुरवात केली.व राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरत वादळात केळी पिकाचे नुकसान झाले.

त्याची नुकसान भरपाई ची कारवाई झाली नाही ,अवाजवी विजबिलांचा प्रश्न तात्काळ सोडवावा,कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर राज्य सरकार निष्क्रिय आहे असे मुद्दे मांडलेया ऑनलाईन सभेमध्ये प्रदेश भाजपच्या व रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षाताई खडसे , विभाग संघटनमंत्री ऍड. किशोरजी काळकर ,जिल्हा संयोजक नवलसिंग राजपूत , भाजप जिल्हाउपाध्यक्ष पद्माकर महाजन , जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील , रावेर लोकसभा संयोजक मा.नंदकिशोर महाजन जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मिलिंद वायकोळे भाजप जिल्हा सरचिटणीस हर्षल महाजन इत्यादी मान्यवर सहभागी झाले.
ऑनलाइन सभेचे नियोजन भाजपा रावेर तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button