अमळनेर सोनगीर बस ला अपघात..
अमळनेर येथील अमळनेर डेपोची अमळनेर सोनगीर बस अमळनेर वरून सोनगीर जात असताना वालखेडा गावाजवळ अपघात झाला आहे. बस क्र MH 20 BL 1418 ही बस सोनगीर कडे जात असताना पलटी झालेली आहे.या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून सर्व प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. येथे मदत कार्य जोरात सुरू असून पावसामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. पण सुदैवाने कोणतीही मृत झाले नसून किरकोळ स्वरूपाची दुखापत वगळल्यास कोणीही गंभीर जखमी नाही.






