पुणे कृषी आयुक्तालय येथे हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी पिकाची मानके करतांना.
विनोद जाधव. पुणे
pune : मा डॉ के पी मोते संचालक, फलोत्पादन,मा शिरीष जमदाळे सह संचालक,मा देवरे मॅडम,मा श्रीमंत रणपिसे विभाग प्रमुख राहुरी कृषी विद्यापीठ,व तेथिल शास्रज्ञ के.बी.पवार,मा बडगुजर,मा कुलकर्णी,स्कायमेटचे तज्ञ.
मी शेतकरी प्रतिनिधी म्हणुन पुढील मुद्दे मांडले
१) पुढील मानके सन २०१९प्रमाणेच राहु ध्यावीत.
२) ट्रिगर निहाय नुकसान भरपाई देतांना जास्त हिट होणार्या ट्रिगरला कमी व हिट न होणाऱ्या ट्रिगरला जास्त नुकसान भरपाई असे न करता सारखी नुकसान भरपाई दिली जावयास पाहिजे.
३) उन्हाळ्यात ४३डिग्रीपेक्षा जास्त उष्षता व प्रति तास २०कि मी पेक्षा जास्त वेगाचे वारे यामुळे केळीचे सर्वात जास्त नुकसान होते,त्याची नुकसान भरपाई दिली जावयास पाहिजे.
४)पुर्वी प्रति तास ४५कि.मी.पेक्षा जास्त वेगाचे वारे असतील तर, तक्रार न करता सरसकट नुकसान भरपाई दिली जावयास पाहिजे.कारण जेव्हा हवामान केंद्रावर जास्त वेगाचे वारे नोंदले जातात, तेव्हा जवळील शेतकऱ्यांचे नुकसान होते व त्यांना नुकसान भरपाई मिळते.मात्र दुरच्या शेतकऱ्यांचे नुकसान होत नसल्याने त्याला नुकसान भरपाई मिळत नाही.व जेव्हा त्याचे नुकसान होते, तेव्हा त्या हवामान केंद्रावर वार्याचा वेग कमी राहु शकतो.त्यामुळे वास्तव असल्यावर त्याला नुकसान भरपाई मिळत नाही.तसेच नुकसान झाले वर सुध्दा शेतकऱ्यांना तक्रार करता येत नसल्याने, तांत्रिक कारणामुळे नुकसान भरपाई मिळत नाही.
५) गारपिट, वादळामुळे नुकसान झाल्यास त्याची सुचना ४८तास ऐवजी ७२ तासांच्या आत ध्यावी. व ही तक्रार करावयास मुदत आहे.तसेच पंचनामा सुध्दा पाच दिवसांच्या आत करावा.
६)वारा व गारपिठ याचा संरक्षण कालावधी जुलै, आॅगस्ट पर्यंत ठेवावा.
वरील मुद्दे हवामानाचे धोके मानके ट्रिगर करीता मी सुचविले.
तसेच योजना योग्य पध्दतीने राबविणे साठी काही सुचना केल्या.
१)केळी फळपिकाचे तीन बहार घेतले जातात.मृग,आंबिया,राम बहार (जानेवारी).पण विमा संरक्षण फक्त आंबिया बहाराला आहे.पुढे तांत्रिक कारणामुळे मृग बहाराची नुकसान भरपाई नामंजुर होऊ शकते.त्याकरीता स्वतंत्र मृग व आंबिया बहाराला संरक्षण दिले जावयास पाहिजे.
२) पिक विमा हप्ता भरतांना शेतकऱ्यांचे कर्ज खाते सोबत बचत खाते क्रमांक सुध्दा ध्यावा.काही वेळेस कर्ज खाते बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही.
३) पिक विमा नुकसान भरपाई वाटप केली जाते,तरी त्याची कोणतीही अधिकृत माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दिली जात नाही.शेतकरी त्यांच्या कडे चौकशी करतात, त्यावेळी अधिकारी माहीती देऊ शकत नाहीत.त्यामुळे नाहक शेतकऱ्यांचा कृषी विभागाविषयी गैरसमज होतो.त्यामुळे नुकसान भरपाई वाटप अगोदर सविस्तर माहिती कृषी विभागाला दिली जावयास पाहिजे.
४) नुकसान भरपाई वाटप करतांना शेतकऱ्यांचे नाव व बँक खाते क्रमांक दोन्हीही बरोबर पाहिल्यावर खाते जमा केले जावयास पाहिजे.काही वेळी चुकीचा बँक खाते दिले जाते.व ते पैसे दुसऱ्याच्याच खात्यात जमा केले जातात.
५) विमा योजना ही शासनाची कंपनी तयार करून चालविली जावयास पाहिजे.कारण विमा कंपन्या काम घेतांना अंदाजीत नफा २०%तरी मिळावा,असे गृहीत धरून टेंडर भरतात. शासकिय कंपनी असेल तर योजनेवरचा खर्च कमी होईल.






