Aurangabad

? धक्कादायक! औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचे ५३ बळी…

? धक्कादायक! औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचे ५३ बळी…
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच ब्लॅक फंगसचे संकट गडद होताना दिसत आहे. त्यातच औरंगाबाद शहरात म्युकरमायकोसिसचा स्फोट झाल्याचे समोर आले आहे.
म्युकरमायकोसिसने औरंगाबादमध्ये आतापर्यंत ५३ जणांचे प्राण गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर म्युकरसायकोसिस रुग्णांची संख्याही तब्बल पावणे सहाशेवर जाऊन पोहोचली.
खाजगी रुग्णालयांकडून आतापर्यंत रुग्ण आणि मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी सुरु होती. मात्र आरोग्य यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार म्युकरमायकोसिसने ५३ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. म्युकरमायकोसिसच्या नव्या माहितीने औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button