Chalisgaon

चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यावर पार्कीग करणाऱ्या अवजड  वाहनांवर कारवाई करावी – रयत सेनेची मागणी

चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यावर पार्कीग करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करावी – रयत सेनेची मागणी

मनोज भोसले

चाळीसगाव – शहरातील अनेक ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडले जात आहेत रस्त्याच्या कडेला व हॉटेल दयानंद जवळील पुलावर अवजड वाहने उभी राहतात, काळी पिवळी वाहनांना पर्यायी वाहनतळ द्यावे शिवाय अवजड वाहतुकीने २ दिवसापुर्वी एका शिक्षकाचा जिव गेला अशा सर्व अवैध वाहनांवर शहर वाहतुक शाखेच्या वतीने कारवाई करावी अशी मागणी रयत सेनेच्या वतीने शहर वाहतुक शाखेकडे निवेदनाद्वारे दि ३० रोजी करण्यात आली आहे.
शहर वाहतुक शाखेचे स पो नि रावसाहेब किर्तीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धुळे रोड वरील मानराज मोटर्स जवळ दि २८ रोजी सकाळी भरधाव डंपर ने शिक्षकाचा बळी घेतला तसेच बायपास असतांना अवजड वाहने शहरातून येतात त्या वाहनांना बंदी करावी. चाळीसगाव शहरातील स्टेशन रोड ते घाट रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावरील मध्यभागी नदीच्या पुलावर अवजड वाहने उभी असतात त्याठीकाणी अवजड डंपर, मोठ्या ट्रक पार्किंग केल्या जातात त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी होऊन पायी चालणारे व शाळेच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणावरून मार्ग काढणे मुश्कील होत आहे त्याठिकाणी छोटा-मोठा अपघात होण्याची शक्यता असून त्या ठिकाणी पार्किंग होत असलेल्या अवजड वाहनां बंदी आणून दडात्मक कारवाई करावी तसेच भडगाव रोड कडे जाणाऱ्या बस स्टॅन्ड ते खरजई नाक्यापर्यंत अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या काळ्या पिवळ्या वाहनांना रस्त्यावर बंदी घालून त्यांना पर्यायी जागेबाबत सूचना कराव्यात, भडगाव रोडवर मुख्य रस्तालगत स्टेट बॅंक, देना बॅंक आहेत त्यांना पार्किंग नसल्याने बॅंकेचे ग्राहकांची वाहने, मोटरसायकली हम रस्त्यावर पार्किंग केल्या जातात त्यामुळे रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी होऊन तासनतास वाहन धारकांना त्याठिकाणी ताटकळत उभे राहावे लागते म्हणून संबंधित जागा मालक किंवा बॅंक मॅनेजर यांना सूचना करून पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी त्यांना सूचना करण्यात याव्यात व सिग्नल चौक ते तहसील कचेरी पर्यंत फळ विक्री करणाऱ्या हातगाड्या रस्त्याच्या कडेला न लावता मुख्य रस्त्यावर लावल्या जातात त्यामुळे रहदारीला अडथळा ठरून वाहतूकीची कोंडी होते त्यांना सक्त सूचना करुन हिरापूर रोड कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या कॉर्नरवर एसटीचा थांबा आहे त्याठिकाणी एसटी थांबल्यावर मागेपुढे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्यामुळे त्या ठिकाणचा बस थांबा बंद करण्यात यावा. शिवाय शहरातील मुख्य रस्त्यांवर घाट रोड, स्टेशन रोड, भडगाव रोड, मालेगाव रोड, मालेगाव रोड आदी भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक दुकानदारांनी त्यांच्या जागेपेक्षा जास्त दुकाने पुढे वाढवली आहेत त्यामुळे त्यांच्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर लागतात त्यामुळे देखील वाहतुकीची कोंडी होते त्या दुकानदारांना समज द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे माहितीच्या प्रती खासदार जळगाव लोकसभा, आमदार चाळीसगाव, अप्पर पोलीस अधीक्षक भाग चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव, पोलीस निरीक्षक शहर पोलिस स्टेशन चाळीसगाव, पोलिस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन चाळीसगाव यांना देण्यात आल्या आहेत.निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे ,शेतकरी सेना जिल्हाअध्यक्ष भाऊसाहेब पाटील,विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष स्पनिल गायकवाड ,तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,भाऊसाहेब सोमवंशी, भरत नवले,विलास पाटील,समन्वयक रोहन पाटील ,शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे, सुनील निंबाळकर,राजेंद्र मांडे, किशोर पाटील ,किशोर जाधव, गोकुळ सपकाळे, राजेंद्र देशमुख ,अभिमान पाटील ,सुनील पाटील, रमेश चौधरी ,अशोक राजपूत ,दिलीपखैरनार, उमेश हाडे , विनोद भोई .भूषण कुमावत.संजय नवले अदि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button